JOIN US
मराठी बातम्या / Viral / मोबाईलवर गप्पा मारत रेल्वे ट्रॅकवर गेली, तिथंच बसली; वरून धडधड करत गेली ट्रेन; भयानक VIDEO

मोबाईलवर गप्पा मारत रेल्वे ट्रॅकवर गेली, तिथंच बसली; वरून धडधड करत गेली ट्रेन; भयानक VIDEO

मुलगी मोबाईलवर बोलता बोलता रेल्वे ट्रॅकवर गेली त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक आहे.

जाहिरात

मोबाईलवर बोलताना मुलीच्या अंगावरून गेली ट्रेन.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 27 ऑक्टोबर : तुम्ही अशा काही लोकांना पाहिलं असेल जे मोबाईलवर बोलताना एका जागी थांबत नाही आणि बोलता बोलता चालत कुठे जातात ते त्यांनाही समजत नाही. अशीच एक मुलगी मोबाईलवर गप्पा मारत चक्क रेल्वे ट्रॅकवर पोहोचली. पोहोचली ती पोहोचली पण ती तिथंच बसली आणि त्याचवेळी ट्रेन आली आणि तिच्यावरून धडाधड गेली. या धक्कादायक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मुलगी मोबाईल फोनवर बोलण्यात इतकी गुंग झाली की ती रेल्वे ट्रॅकवर बसूनच अगदी निवांत गप्पा मारू लागली. ट्रेन आली तरी तिला त्याची खबर नाही. तिला काहीच वाटलं नाही. अगदी आरामात ती ट्रॅकवर बसून गप्पा मारत होती. पुढे जे घडलं ते धक्कादायक आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सुरुवातीला ट्रेन जाताना दिसते. ट्रेन पूर्णपणे गेल्यानंतर जिथून ट्रेन गेली त्या ट्रॅकवर एक मुलगी झोपलेली असल्याचं दिसते. तिच्या हातात फोन आहे. हे वाचा -  VIDEO - कारखाली चिरडण्यापासून वाचला पण…; पुढच्याच क्षणी तरुणावर असं संकट कोसळलं की भरेल धडकी जशी ट्रेन जाते, तशी ती उठते आणि ट्रॅकवर बसते. तिच्या अंगावरून ट्रेन गेल्यानंतर आपल्याला धडकी भरते. पण मुलीला त्याचं काहीच नाही. ट्रेन तिच्यावरून धडधडत गेली तरी तिच्या चेहऱ्यावर किंचितशीही भीती नाही. ती आपली मोबाईलमध्ये बोलण्यात दंग आहे. अगदी शांतपणे ती त्या ट्रॅकवरून उठते आणि तिथून निघून जाते. मुलगी ट्रॅकच्या मधोमध होती म्हणून तिचा जीव वाचला.  व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. त्यांनी संताप व्यक्त केला आहे. यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. हे वाचा -  आधी रिझर्व्ह कोचमध्ये घुसले, नंतर शिक्षकांसमोरच त्यांनी विद्यार्थ्यांना…; रेल्वेतील संतापजनक VIDEO हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी @ipskabra या आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

संबंधित बातम्या

तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या