लग्नासाठी भररस्त्यातच तरुणीचा तरुणाकडे हट्ट.
मुंबई, 30 ऑगस्ट : लाल साडी, हातात लाल चुडा, दागिने घालून नटलेली तरुण भररस्त्यात धावते आहे… एका तरुणाचा ती पाठलाग करते… मेरी शादी करवाओ म्हणत, किंचाळत, ओरडत, रडत ती लोकांसमोर हात जोडून त्या तरुणाला पकडण्याची विनवणी करते आहे… आणि मग सर्व मिळून त्या तरुणाच्या मागे लागले आहेत… एखादा फिल्मी वाटावा असा सीन… पण खरंतर हा रिअल आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. एका तरुणीने लग्नासाठी भररस्त्यात ड्रामा केला आहे. तरुणाला ती आपल्याशी लग्न करण्यासाठी विनवणी करते आहे. पण तिला पाहताच तरुणाने तिथून पळ काढला. त्यानंतर पुढे जे घडलं ते तुम्हीच व्हिडीओत पाहा. व्हिडीओत पाहू शकता लाल साडी नेसलेली एक महिला एका तरुणाचा पाठलाग करताना दिसते आहे. तिला धावताना पाहून काही लोक तिला विचारतात की काय झालं. तेव्हा ती लोकांना मेरी शादी करवाओ अशी विनवणी करू लागते. मग लोकही त्या तरुणाचा पाठलाग करू लागतात. हे वाचा - दोघींचं भांडण पण फायदा मात्र त्याचा! बॉयफ्रेंड कोणाचा यावर भांडत राहिल्या 2 गर्लफ्रेंड, पुढे जे घडलं ते… मीडिया रिपोर्टनुसार ही घटना बिहारच्या नवादातील आहे. भगत सिंह चौकातील हे दृश्य आहे.
महिलेच्या कुटुंबाने दावा केला आहे की, या दोघांचं लग्न ती महिन्यांपूर्वी ठरलं होतं. तरुणाच्या कुटुंबाने हुंडा म्हणून एक बाईक आणि 50 हजार रुपयेही घेतले आहेत. नवरदेव काही ना काही कारण काढून लग्न टाळत होता. त्यामुळे जेव्हा नवरीबाईने त्याला पाहिलं तेव्हा तिने त्याच्याशी लग्न करण्याचा हट्ट केला. त्यावेळी नवरदेव पळू लागला. अखेर त्याला लोकांनी पकडलं. हे वाचा - काला चष्मा गाण्यावर काकूंनी धरला ताल, गाणं सुरू होताच केली अशी स्टेप… Video पाहून सोशल मीडियाचं वाढलं तापमान या प्रकरणात पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. दोन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तेव्हा कुठे तरुण लग्नासाठी तयार झाला आणि पोलीस ठाण्याजवळ असलेल्या मंदिरात लग्न केलं.