नवी दिल्ली, 24 एप्रिल : डेटिंग अॅप्सच्या (Dating App) माध्यमातून एका मुलीने तिच्या आजीसाठी जोडीदार (partner for grandma) शोधून दिला आणि दाखवून दिलं की प्रेमाला (love) वय नसतं. यासाठी मुलीने स्वत: आजीला न सांगता तिच्या जागी अनेक पुरुषांशी संवाद साधला. आता या मुलीची आजी एका पुरुषासोबत मोठ्या आनंदाने राहते. मुलीने एका व्हिडिओमध्ये या संपूर्ण घटनेबद्दल सांगितले. तो आता सोशल मीडियावर व्हायरल (social media viral) होत आहे. कार्ली असं या मुलीचे नाव आहे. तिचा व्हिडिओ 4 दिवसांत 5 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओ शेअर करताना कार्लीने लिहिलं - माझ्या आजीला स्वतःसाठी जोडीदार शोधायचा होता. म्हणूनच मी सर्व डेटिंग अॅप्स डाउनलोड केली. मग मी स्वतःच आजीसाठी जोडीदार शोधला. ते दोघे एकमेकांवर प्रेम करतात. आता दोघेही त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण एकत्र घालवत आहेत. विशेष म्हणजे डेटिंग अॅप्सवर आजीऐवजी कार्ली स्वतःच पुरुषांना मेसेज करायची. यानंतर, त्यापैकी काही जणांना निवडल्यानंतर कार्ली त्यांना तिच्या आजीचा नंबर देत असे. कार्लीने व्हिडिओमध्ये तिच्या आजीचे नाव सांगितलेलं नाही. आजीही नातीने केलेल्या या मदतीमुळे खूप खूश आहे. हे वाचा - भंगार बसला या माणसानं बनवलं Dream Place, आता गर्लफ्रेंडसोबत साजरी करतो सुट्टी! कार्ली म्हणाली, आजी एका सुस्वरूप व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे. या व्यक्तीने फोटोमध्ये कार्लीच्या आजीच्या खांद्यावर हात ठेवला आहे. ते दोघे आउटिंगला (फिरायला) जातात. एकत्र पोहायला जातात आणि बीचवर एकत्र फटाके पाहण्यासाठी जातात. या सगळ्यादरम्यान कार्लीची आजी प्रसन्न हसताना दिसत आहे. एका यूजरने व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना लिहिलंय - की हे आजी-आजोबा एकत्र परफेक्ट जोडीसारखे दिसतात. दुसर्या एका युजरने लिहिलं आहे - हे दोघे सोबत खूप छान दिसत आहेत.