JOIN US
मराठी बातम्या / Viral / Girlfriend ने असा फोटो पाठवला की थेट पोलिसात गेला Boyfriend; सत्य समजताच पुरता हादरला

Girlfriend ने असा फोटो पाठवला की थेट पोलिसात गेला Boyfriend; सत्य समजताच पुरता हादरला

गर्लफ्रेंडने पाठवलेल्या फोटोचं भलतंच सत्य बॉयफ्रेंडसमोर आलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 01 फेब्रुवारी : प्रेम आंधळं असतं, प्रेमात लोक काहीही करण्यासाठी तयार होतात असं म्हटलं जातं. पण  प्रेमात असलेल्या अशाच एका तरुणीने असं काही केलं ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल (Girlfriend boyfriend).  तिचा प्रताप पाहून तिचा बॉयफ्रेंडही (Boyfriend) हादरला. पोलीस ठाण्यापर्यंत हे प्रकरण पोहोचलं आणि पोलीस तपासात जे समोर आलं ते पाहून तरुणीचा बॉयफ्रेंड पुरता हादरला (boyfriend shocked watching Girlfriend photo). त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. 20 वर्षांची लिआ जुमेक्स एका तरुणासोबत तिचं प्रेम प्रकरण सुरू होतं. एक दिवस तिने आपल्या बॉयफ्रेंडला आपला एक फोटो पाठवला. जो पाहून तिच्या बॉयफ्रेंडला धक्का बसला. तो फोटो घेऊन तो पोलीस ठाण्यात पोहोचला. या फोटोत लिआचे हात बांधलेले होते आणि तिच्या डोक्यावर बंदूक लावलेली दिसत होती. तिचं अपहरण झालं होतं आणि तिच्या सुटकेसाठी 2 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. हा असा फोटो पाहून घाबरलेल्या बॉयफ्रेंडने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला. हे वाचा -  पहिल्या प्रसूतीनंतर 8 व्या महिन्यातच झालं दुसरं बाळ; प्रेग्न्सीमुळे महिला शॉक पोलीस तपासात जे सत्य समोर आलं त्यामुळे बॉयफ्रेंड शॉक झाला. त्याच्या गर्लफ्रेंडने जो तिच्या अपहरणाचा फोटो पाठवला होता, तसं तिचं प्रत्यक्षात अपहरण झालंच नव्हतं. खरंतर त्याच्या गर्लफ्रेंडने स्वतःत अपहरणाचा बनाव रचला होता. पैशांसाठी तिने धक्कादायक कृत्य केलं होतं. बॉयफ्रेंडकडून पैसे मिळवण्यासाठी तिने हा सर्व प्रताप केला होता. लियाने स्वतः एका मुलाखतीत याची कबुली दिली आहे. कुटुंबासाठी तिला ख्रिसमस गिफ्ट घ्यायचे होते, त्यासाठी तिला पैसे हवे होते म्हणून तिने हे सर्व केल्याचं ती म्हणाली. हे वाचा -  6 वर्षांनी पत्नीनं केला लैंगिकतेबाबत धक्कादायक खुलासा, ऐकून हादरला पती पण… पण बॉयफ्रेंड पोलिसांकडे गेल्याने तिचा हा प्लॅन फसला. झी न्यूज ने द सनच्या रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार शुक्रवारी प्रेस्टन क्राऊन कोर्टात या प्रकरणावर सुनावणी झाली. लियाला फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगच्या आरोपात दोषी ठरवण्यात आलं आहे. तिला 34 आठवड्यांचा तुरुंगवास आणि 15 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. लंकाशायर पोलिसातील डिटेक्टिव्ह कॉन्स्टेबल लिसा कैरने लियाचा व्यवहार आणि कार्य विचित्र असल्याचं सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या