JOIN US
मराठी बातम्या / Viral / जिराफाशी पंगा नकोच! गाडीचा पाठलाग करतानाचा VIDEO पाहून नेटिझन्स थक्क

जिराफाशी पंगा नकोच! गाडीचा पाठलाग करतानाचा VIDEO पाहून नेटिझन्स थक्क

जिराफ हा प्राणी कधी गाडीचा पाठलाग वगैरे करेल असे स्वप्नात देखील वाटणार नाही. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, जो तुमचे हे सर्व भ्रम काही क्षणात तोडून टाकेल.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 जून : जिराफ (giraffe) या प्राण्याकडे तसा शांत आणि लाजराबुजरा प्राणी म्हणून पाहिले जाते. त्यामुळे जिराफ हा प्राणी कधी गाडीचा पाठलाग वगैरे करेल असे स्वप्नात देखील वाटणार नाही. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, जो तुमचे हे सर्व भ्रम काही क्षणात तोडून टाकेल. एवढेच नव्हे तर थरारक असा हा व्हिडीओ पाहून हृदयाचे ठोके देखील वाढतील. सुधा रामन नावाच्या आयएफएस अधिकाऱ्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जिराफाने गाडीचा पाठलाग करत तिला गाठले आहे. ट्विटरवर सुधा यांनी या व्हिडीओ शेअर केला आहे. ‘जिराफाला कधी डिवचू नका. त्यांचे पाय किती मजबूत आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पाहा. एका किकने ते कोणालाही लोळवू शकतात. ते खूप वेगाने अंत्यंत आकर्षक पद्धतीने धावतात.’ अशी कॅप्शन देत सुधा यांनी या व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ फेसबुकवरील असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

या व्हिडीओमध्ये गाडीतील व्यक्तींना जिराफाने कोणतीही हानी न पोहोचवली नाही. मात्र हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स खूप रोमांचित झाले आहेत. जिराफ इतक्या सहजपणे गाडीचा पाठलाग करू शकेल अशी अपेक्षा कुणी केलीच नव्हती.

संबंधित बातम्या

जाहिरात

लोकांनी या प्रसंगाची तुलना ज्युरासिक पार्कमधील दृश्यांशी केली आहे. (हे वाचा- VIDEO : अगदी शांतपणे पकडला सिंकमध्ये आलेला भलामोठा पायथॉन, नेटकरी आश्चर्यचकित )

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या