JOIN US
मराठी बातम्या / Viral / जिराफासोबत मस्ती करत होती महिला; प्राण्याने चेहऱ्यावरच केला हल्ला, Shocking Video

जिराफासोबत मस्ती करत होती महिला; प्राण्याने चेहऱ्यावरच केला हल्ला, Shocking Video

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Giraffe Attacks on a Woman) दिसतं की महिला जिराफासोबत मस्ती करत आहे. मात्र महिलेनं जिराफाला स्पर्श करताच शेजारी उभा असलेलं दुसरं जिराफ वैतागतं आणि महिलेला अद्दल घडवतं

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 06 जानेवारी : सोशल मीडियावर (Social Media) प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्याचं पाहायला मिळतं. प्राण्यांचे व्हिडिओ अपलोड होताच इंटरनेटवर व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओ अतिशय मजेशीर असतात. मात्र काही व्हिडिओ असेही असतात, जे हे शिकवून जातात की प्राण्यांपुढे केलेली काही कृत्य माणसासाठी अडचणीची ठरू शकतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला असून यात दोन जिराफ दिसत आहेत. यातील एक जिराफ असं काही करत जे पाहून तुम्हीही खळखळून हसाल. रस्त्यावरुन जाणाऱ्या तरुणीला शेळीने शिंगावर उचललं अन्…; हैराण करणारा VIDEO व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Giraffe Attacks on a Woman) दिसतं की महिला जिराफासोबत मस्ती करत आहे. महिलेला वाटतं की हे जिराफ तिला काहीच करणार नाही. मात्र महिलेनं जिराफाला स्पर्श करताच शेजारी उभा असलेलं दुसरं जिराफ वैतागतं आणि महिलेला अद्दल घडवतं. हे जिराफ महिलेच्या चेहऱ्यावर जोराने वार करतं. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर hotelsandresorts नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे.

संबंधित बातम्या

हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं, जेव्हा तुम्ही चुकीच्या जिराफासोबत मस्ती करता. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 1 लाख 70 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं, की जिराफाने अगदी जोरात महिलेच्या चेहऱ्यावर धडक दिली, यामुळे महिलेला प्रचंड वेदना झाल्या. महिलेचे हावभाव पाहूनच याचा अंदाज येतो. या घटनेनंतर आता ही महिला कोणत्याही प्राण्याच्या जवळ जाताना विचार करेल, हे नक्की. रडणाऱ्या घोड्याचा VIDEO Viral, डोळ्यातले अश्रू बघून नेटिझन्स इमोशनल! या व्हिडिओवर हजारो लोकांनी कमेंट केल्या आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने यावर कमेंट करत म्हटलं, खरंच प्राण्यांसोबत जरा विचार करून मस्ती करा. अन्यथा परिणाम काहीही होऊ शकतो. दुसऱ्या एका यूजरने कमेंट करत म्हटलं, प्राणी कधीही काहीही करू शकतात, त्यामुळे त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवणंच योग्य आहे. तर आणखी एकाने लिहिलं, कोणासोबतही अधिक जवळीक चांगली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या