JOIN US
मराठी बातम्या / Viral / खाली फिरतोय महाकाय मासा आणि वर पर्यटकाचं बोटींग; VIDEO पाहून भीतीच वाटेल!

खाली फिरतोय महाकाय मासा आणि वर पर्यटकाचं बोटींग; VIDEO पाहून भीतीच वाटेल!

या पर्यटकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असला तरी मूळात अशा ठिकाणी बोटींग करताना पर्यटकांना घाम फुटत असेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 जानेवारी : सध्याच्या काळात लोक एडव्हेंचरस लाइफ जगण्यासाठी डोंगर, जंगल आणि समुद्राजवळील भागात भटकंती करतात. तेथील स्थानिकांसोबत फिरणं अनेकांना आवडतं. अशावेळी काही भीतीदायक गोष्टींचादेखील सामना करावा लागतो. अशा एडव्हेंचर्स ठिकाणी गेल्यावर अनेकदा लोक आपल्या जीवाची बाजी लावतात. सोशल मीडियावर (Social Media) असे अनेक व्हिडीओ (Video Viral) आहेत. ज्यात लोकांना कसं जगायचं आहे याबाबत अंदाज येतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहूनच आपल्याला भीती वाटेल. येथे तर पर्यंटक अशा भयावह ठिकाणी फिरताना आणि आनंद घेताना दिसत आहेत. हे ही वाचा- एका शिकारीसाठी 3 चित्त्यांशी भिडलं एकटं माकड; VIDEO चा शेवट पाहून हैराण व्हाल नदीत पोहत होता महाकाय मासा सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका नदीचं दृश्य आहे. या नदीत शार्कच्या आकाराऐवढा महाकाय मासा पोहताना दिसत आहे. विशेष म्हणजे येथील पाणी स्वच्छ असल्यामुळे पाण्यातील मासा स्पष्ट दिसून येत आहे. यादरम्यान, कयाकिंग करणारे पर्यटक तेथून जात असताना सर्वात धोकादायक क्षण व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्याने हा महाकाय मासा पाहिला आणि शांत राहिला. मासा पाहिल्यानंतर पर्यटकाना आनंद झाला आहे, मात्र अनेकांची बोबडी वळाली आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होताच, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याचा शोध घेतला जात आहे.

संबंधित बातम्या

अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये केलं जातं कयाकिंग… हा व्हिडीओ यूएस फ्लोरिडाचा आहे. येथे एक weeki wachee नावाची जागा आहे. जेथे पर्यटक मजा-मस्ती करायला येतात. यासाठी तुम्हाला आधीच ऑनलाइन बुकिंग करावं लागतं. येथे कयाकिंग करण्यासाठी चांगलाचं खर्च करावा लागतो. येथे मोठ्या माणसांसाठी 60 डॉलर म्हणजे 4500 रुपये आणि मुलांना 50 डॉलर म्हणजे 3700 रुपये मोजावे लागतील. हा व्हिडीओ thebucketlistglobe नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या