JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO - ये हाथ नहीं हथौड़ा है! एका मिनिटांत फोडले 148 नारळ; सहाव्यांदा मोडला स्वतःचाच World Record

VIDEO - ये हाथ नहीं हथौड़ा है! एका मिनिटांत फोडले 148 नारळ; सहाव्यांदा मोडला स्वतःचाच World Record

एका व्यक्तीने हातांनीच जास्तीत जास्त नारळ फोडण्याचा नवा विक्रम करण्याच्या जिद्दीने आपलाच रेकॉर्ड सहाव्यांदा मोडला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रोम, 27 जुलै : नारळ फोडणं वाटतं तितकं सोपं काम नाही. दगडावर आपटून किंवा नारळावर हातोडा मारूनही बऱ्याचदा नारळ एका फटक्यात फुटत नाही. अशात हाताने नारळ फोडणं म्हणजे सर्वात मोठं आव्हान. असं असताना तुम्हाला विश्वास बसणार नाही पण एका व्यक्तीने तर एका मिनिटात हातांनीच तब्बल 148 नारळ फोडले आहेत. ज्याने कमीत कमी वेळेत हातांनी सर्वाधिक वेळा नारळ फोडण्याचा विक्रम केला आहे. गिनीज बुकमध्येही त्याची नोंद झाली आहे. जर्मनीतील मोहम्मद काहरीमनोविकने स्वतःचाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे. एका मिनिटात त्याने तब्बल 148 नारळ हातांनी फोडले आहेत आणि आपल्या नावे नवा रेकॉर्ड केला आहे. आश्चर्य म्हणजे त्याने आपल्या नावे फक्त नवा रेकॉर्ड केला नाही तर आपलाच हा रेकॉर्ड सहाव्यांदा मोडत एक वेगळाच विक्रम केला आहे. काहरीमनोविकला आपला जुना रेकॉर्ड मोडायचा होता. इटलीतील टीव्ही सीरिज ‘लो शो देई रेकॉर्ड’च्या मिलान सेटवर त्याने नवा रेकॉर्ड बनवण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. हे वाचा -  VIDEO - हिंदी मीडियम दहावी पास, फाडफाड इंग्रजी बोलून विकतो चणे; हटके स्टाइल पाहून तुम्हीही फॅन व्हाल एका मिनिटात जास्तीत जास्त नारळ फक्त हातांनीच फोडण्याचं लक्ष्य होतं.  त्याला हात बदलण्यास परवानगी होती. पण एकाच फटक्यात नारळाचे दोन तुकडे करायचे होते. हे आव्हान त्याने पेललं. चॅलेंज स्वीकारून यशस्वीरित्या पूर्णही करून दाखवलं. त्याचं हे करतब पाहून गिनीज बुकनेही नोंद घेतली.

गिनीज बुकने आपल्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात तुम्ही पाहू शकता काहरीमनोविक फक्त हातांनी कशा पद्धतीने नारळ फोडतो एका. आपल्या डोळ्यांची पापणी लवते न लवते तर तो किती तरी नारळ पटापट फोडून मोकळा होता. एकाच वारात नारळाचे तुकडे तुकडे करतो. हे वाचा -  Robot Broke Boy Finger Video : सोंगटीला हात लावताच रोबोटने तोडलं चिमुकल्याचं बोट; Chess Match चा भयंकर VIDEO मार्शल आर्टिस्ट असलेल्या मोहम्मद काहरीमनोविक हातांनीच वेगवेगळ्या वस्तू तोडल्याने हॅमर हँड्स म्हणूनही ओळखलं जातं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या