JOIN US
मराठी बातम्या / Viral / अद्भुत! हे सुकलेलं पान नाही तर आहे बेडुक; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO

अद्भुत! हे सुकलेलं पान नाही तर आहे बेडुक; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO

तुम्ही कधीच पाहिला नसेल असा बेडुक.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 डिसेंबर : बेडुक (Frog video) म्हटलं की हिरवा किंवा करड्या रंगाचा असतो हे आपल्याला माहिती आहे. पण सध्या सोशल मीडियावर अशा बेडकांचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून तुम्हाला आश्चर्यच वाटेल. हा व्हिडीओ पाहून तुम्ही अद्भुत असंच म्हणाला. खरंतर हा व्हिडीओ पाहून बेडुक आहे, असा विश्वासच बसणार नाही (Frog look like leaf). तुम्ही जो हा फोटो पाहिला तो पाहताच तुम्हाला सुकलेली पानं आहेत असंच वाटेल. पण खरंतर ही पानं नाहीतर तर हे बेडुक आहेत. एखाद्या सुकलेल्या पानांप्रमाणे दिसणारे हे बेडुक. तुम्हाला तरीही विश्वास वाटत नाही तर मग हा व्हिडीओ पाहा.

संबंधित बातम्या

व्हिडीओत पाहू शकता एका व्यक्तीच्या हातात सुकलेली पानं दिसत आहेत. पण तुम्ही नीट पाहाल तर त्या व्यक्तीचा हात ओला आहे आणि आणि त्यावर ही ती पानं हलताना दिसतात. हे वाचा -  बापरे! चक्क बिबट्यासोबतच फोटो काढायला गेला आणि…; सर्वात खतरनाक सेल्फीचा VIDEO तुम्हाला धक्काच बसेल ही पानं नव्हेत तर बेडुक आहेत. एक नव्हे तर तीन तीन बेडुक आहेत ही. आयएफएस अधिकारी  सुरेंद्र मेहरा (Surender Mehra IFS) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.  हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स शॉक झाले आहेत. बेडकाची अशी प्रजाती आम्ही कधी पाहिलीच नसल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. हे वाचा -  म्हशीनं वाचवले कासवाचे प्राण, लोकांनी आनंदानं केला जल्लोष; पाहा VIDEO सुरेंद्र यांनी पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हे मलेशिअन लिफ फ्रॉग आहेत. हे बेडुक जास्त पाऊस असलेल्या जंगलात सापडतात. थायलँडच्या दक्षिणी भागात असतात. सुकलेल्या पानांसारखे दिसत असल्याने शिकारीपासून आपला बचाव करण्यात आणि शिकार करण्यातही त्यांना मदत होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या