JOIN US
मराठी बातम्या / Viral / बेडुकही झालं फिटनेस फ्रीक; उड्यांसोबत आता हातात DUMBBELL घेऊन केली EXCERCISE; VIDEO VIRAL

बेडुकही झालं फिटनेस फ्रीक; उड्यांसोबत आता हातात DUMBBELL घेऊन केली EXCERCISE; VIDEO VIRAL

उड्या मारणाऱ्या बेडकाचा डम्बेलसोबत एक्सरसाईझचा व्हिडीओ व्हायरल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 डिसेंबर : कोरोना महासाथीत प्रत्येकाला जण आपल्या फिटनेसबाबत (Fitness video) जागरूक झाला आहे. त्यामुळे सेलिब्रिटींप्रमाणे सामान्य माणसंही अगदी जीममध्ये जाऊन व्यायाम (Excercise video) करू लागले. योगा, एक्सरसाईझ यासाठी वेळ काढू लागले. फिट राहण्याचं महत्त्व फक्त माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही समजलं आहे (Animal excercise video). सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात चक्क एक बेडूक एक्सरसाइझ करताना दिसल आहे (Frog excercise with dumbbell video). व्हिडीओत पाहू शकता एक बेडून रस्त्यावर पाठ टेकवून झोपलं आहे.  त्याच्या हातात एक खास डंबलही आहे. एक काठी आणि त्याच्या बाजूला दोन फळं लावण्यात आली आहेत. असं डंबल आपल्या दोन्ही हातात घेऊन बेडूक वरखाली करताना दिसतं आहे. हे स्पेशल डंबल आणि बेडकाला एक्सरसाइझ करताना पाहून नेटिझन्स हैराण झाले आहे.

संबंधित बातम्या

comedy_videos7952 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. काही जणांनी बेडकाच्या एक्सरसाईझचं कौतुक केलं आहे. काहींनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी मात्र बेडकाच्या हातात हे डंबल दोरीने बांधण्यात आल्याचं दिसताच प्राण्यांसोबत अशा वागणुकीबाबत संतापही व्यक्त केला आहे. हे वाचा -  इवल्याशा कासवाने घेतला कुत्र्यासोबत पंगा; दादागिरी पाहून व्हाल अचंबित, VIDEO काही दिवसांपूर्वी एका मांजरीचाही असाच व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात ती जीममध्ये पुशअप्स मारताना दिसली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या