ग्रेनोबल, 23 जुलै : फ्रान्समध्ये एक धक्कादायक घटना घडली. एका इमारतीला आग लागल्यानंतर घाबरून दोन मुलांनी तिसऱ्या माळ्यावरून खाली उडी मारली. सुदैवाने दोघांचे प्राण वाचले आहेत. इमारतीच्या खाली असलेल्या बचाव पथकाने मुलांना वाचवले. या सगळ्या अपघाताचा थरारक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार मंगळवारी ग्रेनोबल शहरात ही घटना घडली. इमारतीला आग लागल्यानंतर 3 आणि 10 वर्षीय मुलांनी तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. मिळालेल्या माहितीनुसार, या मुलांचे आई-वडील त्यांना लॉक करून दुकानात गेले होते. त्याचवेळी इमारतीला आग लागली. या मुलांकडे पर्याय नसल्यामुळे त्यांना तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली उडी मारावी लागली. वाचा- भयंकर! दुभंगली जमीन अन् अचानक निघाल्या आगीच्या ज्वाळा, पाहा थरारक VIDEO
वाचा- 4 वर्षांच्या लेकीला वाचवण्यासाठी अपहरणकर्त्यांशी भिडली आई, CCTVमध्ये दिसला थरार सीटीव्ही न्यूजनुसार, या सर्व घटनेचा व्हिडीओ शेजाऱ्यांनी आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केला. या व्हिडीओमध्ये अपार्टमेंटमध्ये आग लागलेली दिसत आहे, तर इमारतीखाली लोकं जमा झाले आहेत. यातच खिडकीच्या बाहेर लटकताना दोन मुलं दिसत आहेत. घराचा दरवाजा लॉक असल्यामुळे ते घराबाहेर पडू शकत नव्हते. प्रसंगावधान दाखवत आधी मोठ्या भावाने लहान भावाला बाहेर काढले, मग स्वत: बाहेर निघाला. त्यानंतर या दोघांनी खाली उडी मारली. वाचा- समुद्र किनाऱ्यावर खेळत होता चिमुरडा मागून आला शिकारी शार्क आणि… या दोघांना कोणतीही दुखापत झाली नाही आहे. मात्र धुरामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, सध्या दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.