JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO - आधी 'बर्गर किंग' नंतर लगीन! लग्न सोडून Burger खायला पोहोचली भुक्कड नवरी

VIDEO - आधी 'बर्गर किंग' नंतर लगीन! लग्न सोडून Burger खायला पोहोचली भुक्कड नवरी

या नवरीला बर्गरपेक्षा महत्त्वाचं दुसरं काहीच नाही, अगदी लग्नही नाही. असंच दिसतं आहे.

जाहिरात

लग्नाच्या दिवशीही नवरीला आवरला नाही बर्गर खाण्याच मोह (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 ऑगस्ट : लग्नात (Wedding Video) भूक लागताच नवरीला (Bride) तिच्या रूममध्ये तुम्ही खाताना पाहिलं असेल किंवा लग्नाच्या जेवणात आवडत्या पदार्थांवर फुडी नवरीने (Foodie Bride) ताव मारतानाही पाहिलं असेल. पण सध्या अशा नवरीचा व्हिडीओ (Bride video) समोर आला आहे, जिने हद्दच केली आहे. लग्नमंडप सोडून नवरी चक्क बर्गर किंगमध्ये (Burger King) पोहोचली आहे. प्रत्येक नवरीला नटल्याथटल्यानंतर आपलं लग्न कधी होतं, याची उत्सुकता असते. त्या क्षणाची ती आतुरतेने वाट पाहत असते. लग्नघटिकेची तिला प्रतीक्षा असते. पण ही नवरी मात्र नटूनथटून लग्नासाठी उभी राहिली नाही तर बर्गर किंगमध्ये (Bride at burger king) बर्गर (Burger) खाण्यासाठी गेली.

संबंधित बातम्या

आपल्यापैकी बहुतेकांना बर्गर आवडतो. अशीच ही नवरीसुद्धा बर्गर लव्हर आहे. या फुडी नवरीने तर हद्दच केली (Bride eat burger).  त्यामुळे अगदी आपल्या लग्नाच्या दिवशीसुद्धा बर्गर खाण्याचा मोह ती आवरू शकली नाही. लेहंगा चोली, डोक्यावर ओढणी आणि दागिने घालून ही नवरी बर्गर किंगमध्ये गेली. तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तर तिला बर्गर किती आवडतो आणि तिला किती भूक लागली आहे, हे स्पष्टपणे दिसून येत आहे. या नवरीला पाहून तर वाटतं तिला बर्गरपेक्षा महत्त्वाचं दुसरं काहीच नाही. विटी वेडिंग (Witty Wedding)  इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या