JOIN US
मराठी बातम्या / Viral / आश्चर्य! रस्त्यावर धावता धावता अचानक हवेत उडू लागली कार; विश्वास बसत नाही तर पाहा Flying Car Video

आश्चर्य! रस्त्यावर धावता धावता अचानक हवेत उडू लागली कार; विश्वास बसत नाही तर पाहा Flying Car Video

Flying car video : फ्लाइंग कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 फेब्रुवारी : कार (Car video) म्हटलं की ती चार चाकं असणारी आणि रस्त्यावर धावणारी गाडीच आपल्या डोळ्यासमोर येते. कधी हवेत उडणारी कार तुम्ही पाहिली आहे का? कदाचित पाहिली असेल तीसुद्धा एखाद्या फिल्ममध्ये (Flying car video). हॉलिवूड फिल्ममध्ये फ्लाइंग कार तुम्ही पाहिल्या असतील. पण प्रत्यक्षात तर नक्कीच नाही. सध्या अशाच एका फ्लाइंग कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे (Car fly in air). रस्त्यावर धावता धावता ही कार अचानक हवेत उडी लागली. पंख उडवत धरतीवरून आकाशात एखाद्या पक्ष्याने भरारी घ्यावी, अगदी तशीच या कारनेही घेतली. व्हिडीओ पाहूनच तुम्ही थक्क व्हाल. किंबहुना तुम्ही तुमच्या डोळ्यांनी हा व्हिडीओ पाहूनही तुमचा विश्वास बसणार नाही. व्हिडीओत पाहू शकता, लाल रंगाची एक कार रस्त्यावर चालते आहे. यामध्ये एक तरुण बसला आहे. त्यानंतर या कारजवळ दुसरी एक गाडी येते. दोघंही आपसात बोलतात आणि मग लाल रंगाच्या कारमधील व्यक्ती आपली कार शेजारील गाडीपेक्षा थोडी पुढे नेतो आणि हे काय? आश्चर्यच ही कार रस्त्यावरून वर जाते म्हणजे ती हवेत उडू लागते. कारचे दोन्ही दरवाजे अगदी पक्ष्याच्या पंखासारखे उघडतात आणि पक्ष्यासारखीच ही कार हवेत उडी लागते. हे वाचा -  12 पेक्षा अधिक वाघांवरही भारी पडलं एक छोटंसं बदक; कशी उडाली दमछाक पाहा VIDEO ही कार चालवणारी व्यक्ती प्रसिद्ध म्युझिशिअन साइरस डोब्रे (Cyrus Dobre) आहे. त्यानेच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. बॅक टू द फ्युचर असं कॅफ्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या

हा व्हिडीओ पाहून बहुतेक नेटिझन्स हैराण झाले आहेत. हे कसं शक्य आहे, असाच प्रश्न सर्वांना पडला आहे. हा व्हिडीओ एडिट करण्यात आला आहे, प्रत्यक्षात असं शक्यच नाही, असं बहुतेक युझर्सनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या