नवी दिल्ली 25 डिसेंबर : ख्रिसमसच्या सणाला सुरुवात झाली आहे. जगभरातील लोक हा सुंदर सण साजरा करण्यात व्यग्र आहेत. ख्रिसमस हा एक दिवसाचा सण असला तरी लोक तो आठवडा अगोदरपासून साजरा करण्यास सुरुवात करतात. लोक एकमेकांना भेटवस्तू देतात, पार्टी करतात आणि ख्रिसमसपर्यंत ते त्याच उत्सवाच्या मूडमध्ये असतात. असाच एक व्यक्ती रेस्टॉरंटमध्ये बसून एंजॉय करताना दिसत आहे. पण याचदरम्यान एक गोष्ट अशी घडते की त्या व्यक्तीसह उपस्थितांनाही धक्का बसतो. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुचाकीला रोखण्यासाठी पोलिसांची धोकादायक पद्धत; रस्त्यावरच दोन्ही गाड्यांनी घेतला पेट, Shocking Video या व्हिडिओत एक व्यक्ती रेस्टॉरंटमध्ये बसून ख्रिसमस गिफ्ट उघडताना दिसत आहे. पण अचानक मोठी दुर्घटना घडते. व्हायरल हॉग या इन्स्टाग्राम अकाउंटवर अनेकदा विचित्र व्हिडिओ शेअर केले जातात. यावर नुकताच एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये एखाद्या चांगल्या प्रसंगी लोकांचा मूड कसा खराब होऊ शकतो, आणि एखाद्या सेलिब्रेशनची मजा कशी खराब होऊ शकते, हे पाहायला मिळेल. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पार्टी करत आहे आणि तिथे आग लागते असं दिसतं. साधारणपणे आता आग लागल्यानंतर लोक घाबरून इकडे-तिकडे धावायला लागतात, पण इथं व्हिडिओमध्ये दिसणारे लोक त्या बाबतीतही वेगळे आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय की, सूट घातलेला एक माणूस रेस्टॉरंटमध्ये बसला आहे आणि कागदाच्या पिशवीतून ख्रिसमस गिफ्ट काढत आहे. व्हिडिओमध्ये दिलेल्या कॅप्शननुसार, रेस्टॉरंटच्या कर्मचार्यांनी त्याला ते गिफ्ट दिलं आहे. त्या पिशवीमधून तो पेपरचे तुकडे काढतो आणि ते टेबलावर ठेवत असतो. पण टेबलावरची मेणबत्ती जळत आहे, हे त्याच्या लक्षात येत नाही. तो पिशवीतून इतर कागद काढत असताना टेबलावर फेकलेल्या एका कागदाला लगेच आग लागते आणि तो जळू लागतो, इतरही कागद पेट घेतात. यानंतर तो एक जळणारा कागद टेबलावरून खाली फेकतो पण दुसरा कागद टेबलावर सतत जळत राहतो. घाबरण्याऐवजी, ती व्यक्ती टेबल क्लॉथ उचलते आणि आगीवर ठेवून हळूहळू विझवण्यास सुरुवात करते. नंतर लगेच ती आग विझते. पाठलाग करत कांगारूचा व्यक्तीवर जबर हल्ला; हैराण करणारा Video Viral या व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत, तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक युजर म्हणाला, ते लोक आग लागूनही किती शांत बसले आहेत. तर, दुसऱ्याने त्या व्यक्तीला धाडसी म्हटलं आहे. तर, एका युजरने म्हटलं की आग लागली, त्यामुळे त्या पिशवीत नेमकं गिफ्ट काय होतं, ते पाहायचंच राहून गेलं.