Optical Illusion
मुंबई 9 ऑक्टोबर : सोशल मीडियावर सध्या लोक ऑप्टीकल इल्यूजन फोटो आणि व्हिडीओचे फॅन झाले आहेत. खरंतर हे फोटो किंवा व्हिडीओ आपले डोळे आणि बुद्धीची परीक्षा घेतात. कारण हे फोटो एक भ्रम तयार करतात. ज्यामुळे लोकांना त्याकडे पाहातान ते पहिल्या नजरेत काही वेगळे असे दिसतात. ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे आपल्या मेंदूला चालना देतात. ज्यामुळे लोक आपल्या मेंदूला रिफ्रेंश करण्यासाठी अशा पर्यायांकडे वळतात. आम्ही तुमच्यासाठी एक असाच फोटो घेऊन आलो आहोत. जो पहिल्या वेळी तुमच्या नजरेला धोका देईल. या व्हायरल फोटोमध्ये तुम्हाला लपलेल्या चोराचा शोध घ्यायचा आहे. या व्हायरल ऑप्टीकल फोटोमध्ये एका घराजवळ दोन व्यक्ती उभे असल्याचे तुम्ही पाहू शकता. परंतू त्यांचं बोलणं ऐकत तेथे एक चोर उभा आहे. परंतू हे लक्षात घ्या तुम्हाला चोर पूर्ण दिसणार नाही तर तुम्हाला त्याचं तोंड शोधायचं आहे. तुम्हाला तो चोर दिसला तर तुम्ही खूप हुशार आहात असं समजा.
हे ही वाचा : तुमची नजर, बुद्धिमत्तेची घ्या चाचणी! चित्रातल्या ‘या’ वृद्धाच्या पत्नीला शोधा 11 सेकंदांत
हा फोटो पाहा आणि चोराचा चेहरा शोधण्याचा प्रयत्न सुरू करा. पण योग्य उत्तर शोधण्याआधी तुमच्या मोबाईलमध्ये टायमर नक्की सेट करा. अवघ्या 5 सेकंदात तुम्हाला हे करायचं आहे. खरंतर सोशल मीडियावर देखील फार कमी लोकांना हे चोर शोधण्यात यश मिळालं आहे. पण तुम्ही काहीही काळजी करु नका. या फोटोकडे तुम्ही बारकाईने पाहिलंत तर तुम्हाला याचं उत्तर शोधता येईल. जर तुम्हाला या फोटोमध्ये लपलेला चेहरा दिसत नसेल, तर फोटोच्या उजव्या बाजूला योग्य उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. तरीही, जर तुम्हाला बरोबर उत्तर मिळत नसेल, तर काही फरक पडत नाही, तुम्हाला उत्तर शोधण्यासाठी आम्ही मदत करत आहोत. पाहा इथे लपलाय चोर
Optical Illusion
तुम्हाला जरी हे कोडं सोडवता आलं नसेल, तरी काळजी करु नका पुढच्या वेळी पुन्हा ट्राय करा आणि तुमच्या मित्रांना हा फोटो पाठवा आणि पाहा त्यांना तरी हे कोडं सोडवता येतंय का?