तिरुअनंतपुरम 01 सप्टेंबर : लग्नात मारहाण झाल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतीलच. मात्र, त्यांच्या मारामारी आणि भांडणाचं कारणही नक्कीच मोठं असेल. पण लग्नात पापडसाठी तुफान हाणामारी झाल्याचं तुम्ही नक्कीच ऐकलं नसेल. असाच एक धक्कादायक प्रकार केरळमधील अलप्पुझा येथून समोर आला आहे. लग्नात पापडावरून मोठा वाद झाला. यात नवरी आणि नवरदेवाकडील लोकांमध्ये जोरदार भांडणं झालं. आता या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पुणे : नशेत इमारतीच्या खिडकीतून उतरण्याचा प्रयत्न, चौथ्या मजल्याहून कोसळून मृत्यू, विचलित करणारं दृश्य मीडिया रिपोर्ट्सनुसार, पापडावरून झालेल्या भांडणात सहा जण जखमीही झाले आहेत. वराच्या कुटुंबातील काही सदस्यांनी जास्तीचे ‘पापड’ मागितले मात्र त्यांना नकार देण्यात आला यानंतर ही हाणामारी सुरू झाली. दोन्ही पक्षातील लोकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लोक एकमेकांना चप्पलने मारताना दिसत आहेत. एकमेकांना मारण्यासाठी त्यांनी खुर्च्या आणि टेबलचाही वापर केला.
अलप्पुझा येथील मुत्तोम येथील एका विवाह मंडपात ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी अलप्पुझा पोलिसांनी 10 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ज्यांची ओळख पटवली जात आहे. मुलं-बायकांनी भरलेली बोट उलटली, दुर्घटनेचा थरारक LIVE व्हिडीओ आला समोर या घटनेत वराच्या काही मित्रांनी आणखी पापड मागितले होते, जे देण्यास केटरिंग एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी नकार दिला. यावरुनच हे भांडण सुरू झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. सुरुवातीला त्यांच्यात वाद सुरू झाला आणि नंतर याचं हाणामारीत रूपांतर झालं.