JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO - Nagin dance करत करत जवळ आले आणि 2 तरुणांनी असं काही केलं की सर्वजण झाले शॉक

VIDEO - Nagin dance करत करत जवळ आले आणि 2 तरुणांनी असं काही केलं की सर्वजण झाले शॉक

असा नागिन डान्स तुम्ही कधीच पाहिला नसेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21  डिसेंबर :  लग्नाची हळद, लग्नाच्या वरात यात तुम्ही बऱ्याच प्रकारचे डान्स पाहिले असतील. प्रत्येक व्यक्तीची डान्स करण्याची एक हटके पद्धत असते. पण अशा कार्यक्रमात सर्वात फेमस कोणता डान्स असेल तर तो नागिन डान्स (Nagin dance video). कुणाला नाचता येत असेल किंवा नसेल पण नागिन डान्स हा प्रत्येकाला जमतो (Funny dance video). नागिन गाण्याची धून वाजताच किती तरी लोकांच्या अंगात जणू संचारतं आणि नागाच्या फणासारखे हात करत नागासारखे डोलू लागतात. हा डान्स करताना समोर दुसरी व्यक्ती असेल तर मग या डान्सची रंगत अधिकच वाढते. सध्या अशाच एका नागिन डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात नागिन डान्स करता करता दोन तरुणांमध्ये दंगलच झाली. व्हिडीओत पाहू शकता बँडवर नागिन धून वाजवली जात आहे. त्यावेळी दोन तरुण एकमेकांसमोर येतात. दोघंही आपल्या हातांचा नागासारखा फणा बनवणात आणि डोक्यावर धरवून हात नागाच्या फण्यासारखे डुलवत नाचतात. त्यानंतर जशी नाग आपल्या फण्यांनी एकमेकांशी फाईट करतात तशीच फाईट हातांनी करण्याचा प्रयत्न हे तरुण करतात.

संबंधित बातम्या

थोड्या वेळाने एक तरुण दुसऱ्या तरुणावर खरोखरच नागासारखा हल्ला करताना दिसतो. म्हणजे त्याच्या फण्यासारखा हातांना त्या व्यक्तीला स्पर्श होतो आणि मग काय आपल्यावर हल्ला होताच ती व्यक्ती इतकी संतप्त होते की आपण नागिन डान्स करत आहोत हेच विसरून जाते. त्या व्यक्तीच्या अंगातून नाग निघून जणू सिंहच संचारतो आणि आपल्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला तो चोप चोप चोपून काढतो. त्यानंतर काही लोक मध्ये पडतात आणि त्या तरुणांना मारहाण करण्यापासून रोखतात. हे वाचा -  हातपाय न लावताच झाडावर सरसर चढला; तरुणाचा Jugaad Video पाहून नेटिझन्स हैराण हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सना हसू आवरलं नाही आहे. यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या