नवी दिल्ली 08 जानेवारी : दक्षिण आफ्रिकेतील बोत्सवानाच्या जंगलात आपल्या कुटुंबासोबत मजा करत असलेल्या इम्पालाच्या पडसाला याचा अंदाजही नव्हता की पुढच्या क्षणी त्याच्यासोबत काय होणार आहे. इम्पालाच्या आईनं आपल्या पिल्लासाठी एक सुरक्षित जागा शोधली होती. मात्र संकट कुठूनही येऊ शकतं, याची तिला कल्पाना नव्हती. या खेळत्या पिल्लावर अचानक एका अजगराने हल्ला केला (Python Attacks on Impala), त्यानंतर एका झटक्यात पिल्लू अजगराच्या मजबूत पकडीत पूर्णपणे अडकलं. रेस्टॉरंटमध्ये शिरली म्हैस; समोर येणाऱ्या प्रत्येकाला शिंगाने उडवलं, Video अजगर आणि पडसाच्या संघर्षाचा फायदा घेण्याच्या उद्देशाने एक तरसही तिथे आलं आणि धैर्याने आपली वेळ येण्याची वाट बघत राहिलं. शिकारीचा हा व्हिडिओ (Shocking Video) LatestKruger च्या youtube चॅनल www.latestsightings.com वर अपलोड केला गेला आहे.
अजगर, इम्पालाचं पिल्लू आणि तरस यांचा हा तिहेरी संघर्ष माईक सदरलँड यांनी शूट केला आहे. इथे इम्पालाची अनेक पिल्लं आजूबाजूला फिरत होती. या सर्वांपासून काही अंतरावरच एक तरससह फिरत होतं. कदाचित तो शिकारीची संधी शोधत होता. मात्र त्याने शिकारीवर झडप घालण्याआधीच अजगराने एका पिल्लाला आपल्या जबड्यात पकडलं. खुर्चीवर बसलेल्या कर्मचाऱ्यासोबत घडलं भलतंच; पाहून सगळेच शॉक, Watch Video तरसाने इम्पालाच्या पिल्लाला अजगराच्या तावडीतून सोडवून स्वतः त्यावर ताव मारण्यासाठी बराच वेळ प्रयत्न केला. त्याने अजगरावर वार करण्याचा प्रयत्न केला, त्याला अनेक मीटर दूर ओढत नेलं, मात्र अजगराने आपली शिकार सोडली नाही. तरसही हार मानायला तयार नव्हतं, त्याने आपले प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर अजगराला हार मानावी लागली आणि तो आपली शिकार सोडून झाडावर जाऊन बसला आणि तरसाने या शिकारीवर ताव मारला.