नवी दिल्ली, 11 एप्रिल : जगभरात असे अनेक लोक आहेत जे काही ना काही गोष्टी करुन इतरांना हैराण करतात. काही लोकांनी तर त्यांच्या गोष्टींमुळे वर्ल्ड रेकॉर्डही (Guinness World Records) केला आहे. असा एक वर्ल्ड रेकॉर्ड एका शेतकऱ्याने केला आहे. एका शेतकऱ्याने आपल्या मेहनतीने असं काम केलं आहे, की त्याचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे. या शेतकऱ्याने टोमॅटोची शेती केली आणि केवळ टोमॅटोच्या एका रोपट्याला इतके टोमॅटो लागले की (Gardner Grow 1269 Tomatoes From Single Plant Stem) त्याचं नाव थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे. ऑडिटी सेंट्रल वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, ब्रिटनच्या हर्टफोर्डशायर (Hertfordshire, Britain) येथे राहणारा एक शेतकरी आणि गार्डनर डगलस स्मिथ (Douglas Smith) याने स्टेम अर्थात केवळ एका रोपट्यापासून सर्वाधिक टोमॅटो उगवण्याचा रेकॉर्ड (Most tomatoes From Single Plant) नोंदवला आहे. या रोपट्याला 1,269 टोमॅटो आले ज्यामुळे रेकॉर्ड सेट झाला. मागील वर्षी हा रेकॉर्ड एका रोपट्यावर 488 फळं आल्याचा होता. मात्र आता या टोमॅटोच्या रोपट्याने आधीचा रेकॉर्ड तोडला आहे. डगलस याला हॉर्टीकल्चरची अतिशय आवड आहे. तो आपल्या गार्डनमध्ये दररोज 4 तास घालवतो. तो जगातील सर्वात चांगला गार्डनर बनू इच्छित आहे. आधीचा रेकॉर्ड मोडून नवा रेकॉर्ड करण्यासाठी त्याने अनेक सायन्टिफिक पेपर्सचा अभ्यास केला आणि मातीचे सँपलही एकत्रित केले. या सँपलचं लॅबमध्ये टेस्टिंगही केलं. त्यानंतर मोठ्या मेहनतीनंतर हा रेकॉर्ड सेट झाला.
डगसलचा हा पहिलाच रेकॉर्ड नाही. याआधीही त्याने एक नॅशनल रेकॉर्ड केला होता. तो नेहमी एक्सपेरिमेंट करुन कोणत्या प्रजातीचं रोपटं किती फळं उगवेल याचा अंदाज लावत असतो. 2020 मध्ये त्याने 20 फूट उंच सनफ्लॉवर उगवलं होतं आणि नॅशनल रेकॉर्ड केला होता. त्याशिवाय याआधी त्याने एकदा 3 किलोचा एक टोमॅटोही उगवला होता.