JOIN US
मराठी बातम्या / Viral / भूत, प्रेत की आणखी काही? CCTV मध्ये लोकांना दिसली अशी गोष्ट Video पाहून फुटेल घाम

भूत, प्रेत की आणखी काही? CCTV मध्ये लोकांना दिसली अशी गोष्ट Video पाहून फुटेल घाम

हा फूटेज पाहिल्यानंतर तेथील स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. लोक बाहेर पडायला घाबरत आहेत.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 25 जानेवारी : सोशल मीडियावर कधी कोणते व्हिडीओ व्हायरल होतील याचा काही नेम नाही. इथे मनोरंजनापासून ते धोकादायक अपघातापर्यंत वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. शिवाय येथे भूतासंदर्भात देखील व्हिडीओ शेअर करत असतात. सध्या असाच एक खतरनाक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून काहिंच्या अंगावर काटा आला आहे. हा व्हिडीओ ट्वीटरवर पत्रकार Dinesh Kumar यांनी आपल्या अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओत भूत दिसत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच ही घटना यूपीमधील आलीगढमधील आहे. त्यांनी सांगितलं की न्यू राजेंद्रनगर परिसरातील हे सीसीटीव्ही फूटेज आहे. हे ही पाहा : पहाटे ३ वाजता हॉस्पिटलमध्ये ‘भूताची एन्ट्री’? Viral Video पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम हा फूटेज पाहिल्यानंतर तेथील स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. लोक बाहेर पडायला घाबरत आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक गल्ली दिसत आहे. रात्र असल्यामुळे या गल्लीत लोकांची ये-जा नाही. अशा शांत रस्त्यावर अचानक हालचाल दिसते, ज्यामध्ये सफेत कपड्यात कोणीतरी आल्याचं जाणवतं. यानंतर सफेद कपड्यामधील ही गोष्ट थोडी लांबच्या दिशेने चालत जाते आणि पुढे जाऊन अचानक गायब होते.

संबंधित बातम्या

लोकांचं असं म्हणणं आहे ती सफेद रंगात दिसणारी ती गोष्ट म्हणजे एक भूत आहे, जे अचानक आलं आणि गायब देखील झालं. पण ते खरंच भूत आहे की हा व्हिडीओ एडिट केलाय हे सांगता येणं कठीण आहे. त्यामुळे या व्हिडीओची सत्यता तपासणे जास्त गरजेचं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या