JOIN US
मराठी बातम्या / Viral / लाल, पिवळा, निळा नाही, तर टायरचा रंग नेहमी काळा का असतो? या मागचं कारण रंजक

लाल, पिवळा, निळा नाही, तर टायरचा रंग नेहमी काळा का असतो? या मागचं कारण रंजक

टायरचा रंग तुम्ही काळा असल्याचे पाहिले असेल, पण तुम्ही कधी विचार केलाय की, चाकाचा रंग काळा का असतो? ते इतर कोणत्याही रंगाचे का नसतात?

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 6 सप्टेंबर : आपल्या आजूबाजूला अनेक वाहान तुम्ही पाहिली असतील. यामध्ये कार, ट्रक, विमान आणि बस इत्यादी येतंच. त्याने तुम्ही प्रवास देखील केला असावा. परंतू तुम्ही कधी या वाहानांच्या चाकांबद्दल विचार केलाय? गाडीचं चाक किंवा टायर हे गाडीच्या महत्वाच्या भागांपैकी एक आहे, कारण त्याच्याशिवाय तुम्ही एक पाऊल देखील पुढे जाऊ शकत नाही. तसे पाहाता चाकांचा आकार आणि जाडी वेगवेगळी असते आणि वेगवेगळ्या वाहानांसाठी वेगवेगळे टायर लावले जातात. परंतू या सगळ्यात महत्वाचं असतं, ते म्हणजे या टायरचा रंग. टायरचा रंग तुम्ही बऱ्याचदा काळा असल्याचे पाहिले असेल, पण तुम्ही कधी विचार केलाय की, चाकाचा रंग काळा का असतो? ते इतर कोणत्याही रंगाचे का नसतात? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला आधी त्याचा इतिहास जाणून घ्यावा लागेल. टायर्सचा इतिहास 1800 चा आहे. टायर हा मूळ फ्रेंच शब्द आहे ज्याचा मुळ शब्द टायरर आहे. ज्याचा अर्थ ओढणे असा होतो. एअर रबर टायरच्या आधी, हे गाड्यांचे टायर चामड्याचे, लोखंडाचे किंवा लाकडाचे बनलेले होते, जे चाकांना तुटण्यापासून वाचवायचे. गुडइयरने पहिला रबर टायर बनवला व्हीलराईट नावाच्या कारागिराने प्रथम रबर टायरचा शोध लावला. 1800 मध्ये, चार्ल्स मॅकेनटोशने ऍमेझॉन आणि इतर ठिकाणच्या झाडांच्या द्रवापासून रबर बनवले. मात्र हवामानाशी ताळमेळ राखता आला नाही. त्यानंतर चार्ल्स गुडइयरने 1839 मध्ये वुलकेनाइज्ड रबरचा शोध लावला, जो मजबूत आणि ताणण्यायोग्य होता. त्याचा वापर सुरुवातीला सायकलमध्ये केला जात असे. पण या टायरमध्ये अनेक समस्या होत्या 1845 मध्ये वायवीय किंवा हवेने भरलेले टायर बनवले गेले. रॉबर्ट विल्यम थॉमसन यांनी या शोधाचे पेटंट स्वतःच्या नावावर केले. थॉमसन स्कॉटिस हे शोधक होते. चामड्याच्या आवरणात हवा भरण्यासाठी त्याने विविध आकाराच्या पातळ नळ्या बनवल्या. हे टायर हादरे सहन करू शकतील असे होते. पण ते कधीच उत्पादनात गेले नाही, कारण त्यात अनेक समस्या होत्या. हे वाचा : रेस्टॉरंटमधील बाथरूम वापरण्यापूर्वी 100 वेळा विचार करा, हा फोटो पाहून तुम्हाला बसेल धक्का पण फार कमी लोकांना हे माहीत असेल की १२५ वर्षांपूर्वी जेव्हा पहिला रबर टायर तयार झाला तेव्हा त्याचा रंग पांढरा होता. ते तयार करण्यासाठी वापरलेले रबर दुधाळ पांढरे होते. पण त्यानंतर त्याचा रंग काळा कसा झाला? याचे उत्तर असे आहे की ज्या रबर आणि मटेरिअलपासून हा पांढरा टायर बनवला गेला आहे ते ऑटोमोबाईलचे वजन सहन करण्यास पुरेसे मजबूत नव्हते आणि ते रस्त्यावर चांगले कार्य करू शकत नव्हते. त्यामुळे त्याला शक्तिशाली आणि मजबूत बनवण्याची गरज भासू लागली, ज्यामुळे ते शक्तिशालीही होईल आणि दीर्घकाळ चालेल. त्यानंतर या रबरमध्ये कार्बन ब्लॅकसारखे पदार्थ मिसळले गेले, त्यामुळे टायरचा रंग पूर्णपणे काळा झाला. पण टायरची ताकद, क्षमता आणि जास्त काळ टिकणारी क्षमता वाढली. हे वाचा : हॉटेलबाबत हे रहस्य तुम्हाला माहितीय का? बऱ्याच ठिकाणी नसते 13 नंबरची रुम, काय आहे यामागचं सत्य? कार्बन ब्लॅकमुळे, रस्त्यावरून चालताना रस्त्याच्या पृष्ठभागामध्ये होणारे प्रचंड घर्षण सहन करणारा टायर तयार झाला. तसेच हे टायर गरम रस्त्यावर चालण्यात देखील सक्षम आहे. या कारणामुळे मग हे टायर ऑटोमोबाईलच्या प्रत्येक विभागात वापरले गेले. इतकेच नाही तर कार्बन ब्लॅक टायर्सचे संरक्षण करण्यासाठी आणि ओझोन ते अतिनील किरणोत्सर्गाच्या हानिकारक प्रभावापासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या