प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)
अजमेर, 28 ऑक्टोबर : तुम्हाला एखादा पदार्थ आवडत असेल, तुम्ही तो रोज खात असाल आणि एके दिवशी तुम्हाला त्या बदल्यात दुसरं काही तरी दिलं तर तुम्हाला राग येईल हो की नाही… पण प्राण्याच्या बाबतीत असं घडलं तर… आणि तो प्राणी हत्ती असेल तर… तुम्ही म्हणाल प्राण्यांना इतकं चवीचं काय, त्यांना जे मिळेल ते खातील. पण तुम्हाला धक्का बसेल एक हत्ती तुमच्यासारखाच चवीने खातो. त्याला एका पदार्थाची इतकी सवय लागली की त्याबदल्यात त्याला दुसरा पदार्थ दिला आणि तो इतका चवतळला की त्याने दुकानदाराची भयंकर अवस्था केली. राजस्थानमधील हे धक्कादायक प्रकरण आहे. इथल्या आमेर किल्ला परिसरातील मादी हत्ती गौरी, जी पर्यटकांना फिरवते. तिला मावे की गुंजी ही मिठाई आवडते. गौरी दररोज रूप नारायण कुलवालच्या दुकानाजवळून जाते. कुलवाल गौरीला रोज तिची फेव्हरेट मिठाई खायला द्यायचा. पण दिवाळीच्या दोन दिवस आधी गौरी जेव्हा त्याच्या दुकानदारावर आली तेव्हा त्याने तिला गोड गुंजी ऐवजी गरमागरम आणि मसालेदार कचोरी खायला दिली. त्यामुळे तिला राग आला. ती इतकी चवताळली की तिने दुकानदारावर हल्ला केला. तिने दुकानदाराला सोंडेत धरून आपटलं. त्यानंतर त्याला जमिनीवर फरफटत नेलं. हे वाचा - नियतीचा अजब खेळ! बळीचा कोंबडा वाचला पण बळी द्यायला गेला त्याचाच जीव गेला आज तक च्या वृत्तानुसार या घटनेबाबत माहिती देताना आमेर किल्लाचे अधीक्षकांनी सांगितलं की, सोमवारी ती नेहमीच्या दुकानावर थांबली, तिच्यासोबत आणखी दोन हत्ती होते. दुकानदाराने चुकीने गौरीऐवजी इतर हत्तींना गुंजी दिली आणि गौरीला कचोरी दिली. नेहमी शांत राहणाऱ्या गौरीने जशी कचोरी खाल्ली तसं तिने दुकानदाराला सोंडत धरून जमिनीवर आपटलं.
हत्तीच्या हल्ल्यात त्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हे वाचा - खेकड्याने स्वत: उपटून काढला आपला दुसरा हात, विचित्र वागण्याचा व्हिडीओ व्हायरल आमेर किल्ल्याजवळ पर्यटकांना फिरवण्याचं काम हत्ती कित्येक वर्षांपासून करत आहेत. पण गेल्या शंभर वर्षात जयपूरमध्ये कोणत्या हत्तीचा जन्म झाला नाही. महावत दुसऱ्या ठिकाणाहून हत्ती खरेदी करून आणायचे. 2022 साली बाहेरून विकत आणलेल्या अशाच एका हत्तीपैकी एक हत्तीण गर्भवती होती. तिने जयपूरमध्ये आपल्या पिल्लाला जन्म दिला. ती ही गौरी. गौरी शांत आहे, आजपर्यंत तिने कुणावरच हल्ला केला नाही, असं सांगितलं जातं. हल्ल्याची तिची ही पहिलीच वेळ आहे.