JOIN US
मराठी बातम्या / Viral / स्पर्मशिवाय 8 महिन्यांची 'प्रेग्नेंट' झाली तरुणी; डॉक्टरांनी पाहिलं तर पोटात वाढत होता 13 किलोंचा मृत्यू

स्पर्मशिवाय 8 महिन्यांची 'प्रेग्नेंट' झाली तरुणी; डॉक्टरांनी पाहिलं तर पोटात वाढत होता 13 किलोंचा मृत्यू

डॉक्टरांनी पाहिल्यानंतर तरुणीसह तिच्या पालकांनाही मोठा धक्का बसला.

जाहिरात

सर्वजण तिला गर्भवती समजू लागले होते.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

इंग्लंड, 15 ऑगस्ट : एका महिलेसाठी गर्भवती होणं हा अत्यंत भावनिक क्षण असतो. आपल्या गर्भात एक लहानशा गर्भाला मोठं होताना अनुभवणं महिलांसाठी मोठी बाब असते. निसर्गाने महिलेलाच ही संधी दिली आहे. महिलेच्या गर्भापत 9 महिन्यांपर्यंत (9 Month Pregnancy) बाळ मोठं होतं जातं. मात्र महिलेला गर्भधारणा होण्यासाठी आधी सेक्स करावं लागतं. आता तर आयव्हीएफ (IVF) आणि अन्य नवनवं तंत्रज्ञान आलं आहे. मात्र यातही पुरुषाच्या स्पर्मची गरज असतेच. इंग्लंडमध्ये राहणारी 19 वर्षीय एबीला आपलं वाढलेलं पोट पाहून गर्भवती असल्यासारखी वाटत होती. मात्र तिचे कोणासोबत शारिरीक संबंध आलेच नव्हते. तरीही तिचं पोट गर्भवती महिलेप्रमाणे वाढलं होतं. जेव्हा ती डॉक्टरकडे गेली तेव्हा तिच्यासह कुटुंबीयांनाही धक्का बसला. तरुणीच्या पोटात 13 किलोचा मृत्यू वाढत होता. अचानक वाढलं वजन.. एबी सर्वसामान्यपणे जगत होती. मात्र गेल्या वर्षी अचानक तिचं वजन वाढू लागलं. पहिल्यांदा तिला वाटलं की जास्त खाल्ल्यामुळे तिचं वजन वाढल आहे. यादरम्यान तिने डायटिंगही सुरू केली. मात्र वजन कमी होत नव्हतं. त्यानंतर तिचं पोट हळूहळू वाढू लागलं. आपलेलं वाढलेलं पोट पाहून एबी चिंतेत होती. लोकही तिला प्रेग्नेंट समजू लागले होते. मात्र आपण गर्भवती नसल्याचं तिला माहित होतं. कारण कोणासोबतच तिचे शारिरीक संबंध झाले नव्हते. हे ही वाचा- Bride Video: ना कपड्यांची चिंता ना मेकअपची;लिफ्टमध्ये जमिनीवर बसून नवरीची पार्टी डॉक्टरांनी सांगितलं कारण… पहिल्यांदा तर एबीला आपलं वाढतं पोट पाहून टेन्शन आलं. त्यानंतर मात्र तिला पोटदुखीही सुरू झाली. एबी काहीच काम करू शकत नव्हती. तिचं पोट खूप वाढलं होतं. शेवटी एबीने डॉक्टरांना दाखवण्याचं ठरवलं. तेथे गेल्यासमोर कळालं की एबीच्या पोटात तब्बल 13 किलोचा ट्यूमर होता. हा ट्युमर लवकर काढला नसता तर त्याचे परिणाम भयंकर ठरले असते. रात्रभर सुरू होती शस्त्रक्रिया.. एबीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येथे शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातील ट्यूमर काढण्यात आलं. एबीची सर्जरी रात्रभर सुरू होती. यानंतर डॉक्टरांनी 12 किलो 700 ग्रॅम ट्यूमर बाहेर काढला. सर्जरीनंतर एबीची तब्येत सुधारत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या