JOIN US
मराठी बातम्या / Viral / मद्यधुंद महिलेनं घेतली सिंहाच्या पिंजऱ्यात उडी आणि मग...

मद्यधुंद महिलेनं घेतली सिंहाच्या पिंजऱ्यात उडी आणि मग...

एक महिला दारुच्या नशेत सिंहाच्या पिंजऱ्याजवळ गेली. जेथे गेल्यानंतर जे व्हायचं तेच झालं.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 26 जानेवारी : दारुच्या नशेत लोक काय करतील याचा काही नेम नाही. काही लोक दारु प्यायल्यावर इतके शुर होतात की त्यांना वाटतं की ते जगाच्या पाठीवर काहीही करु शकतात. असंच काहीसं एका महिलेनं केलं, ज्यानंतर तिची अशी अवस्था झाली की ती थेट पोहोचली रुग्णालयात. खरंतर एक महिला दारुच्या नशेत सिंहाच्या पिंजऱ्याजवळ गेली. जेथे गेल्यानंतर जे व्हायचं तेच झालं, सिंहाने या महिलेचा हात आपल्या तोंडात धरला, ज्यानंतर या महिलेचा हात सिंहाच्या तावडीतून सोडवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. ज्यानंतर या महिलेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे ही पाहा : वेगळ्या पद्धतीची चहा पिण्याच्या नादात असा फसला तरुण, आता स्वप्नात सुद्धा थरथर कापेल, पाहा Video हे प्रकरण रशियातील प्राणीसंग्रहालयातील आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे प्रकरण रशियातील उसुरिस्कचे आहे. प्राणीसंग्रहालयाने एक निवेदन जारी करून ती महिला दारूच्या नशेत होती आणि तिने सिंहाला चिथावणी दिली. यानंतर सिंहाने चिच्यावर हल्ला केला असल्याचे सांगितले. संध्याकाळ झाली असता. प्राणीसंग्रहालयातून लोकांना बाहेर काढत असताना महिलेने कुंपणावरून उडी मारली होती. संग्रहालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, ती महिला पूर्वी आजूबाजूला पाहत होती. त्यानंतर त्याने कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्यापासून एक मीटर अंतरावर एक सूचना फलक होता, ज्यावर लिहिले होते, ‘कुंपणाच्या पलीकडे जाऊ नका. पण तरीही ती महिला गेली. त्यानंतर आम्हाला आरडाओरडा ऐकू आला, ज्यानंतर आमचे कर्मचारी धावून आले, ही महिला तेव्हा या कुंपनात जात होती. सगळ्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती महिला थांबली नाही. हे सर्व काही सेकंदात घडले. त्यामुळे कोणालाच काही करायला मार्ग नव्हता.

निवेदनात म्हटले आहे की, ‘दुर्दैवाने ती भिंतीच्या खूप जवळ गेली आणि सिंहाने तिचा हात पकडला. त्याने पिंजऱ्याच्या आतील भिंतीवरून महिलेला ओढले. त्यानंतर प्राणी संग्रालयाने लगेच रुग्णवाहिका बोलावली. आता ती महिला रुग्णालयात असून डॉक्टर तिचा हात वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण सिंहाने तिच्या हाताचा बराचसा भाग खाल्ला होता. सोशल मीडियावर ही बातमी समोर येताच, लोकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. अनेकांनी महिलेची खूप मोठी चुक असल्याचे सांगितले. तर अनेकांनी तिच्या कर्माचं फळ असल्याचं देखील म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या