प्रतीकात्मक फोटो
लंडन, 03 फेब्रुवारी : सध्या ऑनलाइनचा जमाना आहे. लोक सोशल मीडियावर (Social Media) मेसेज, पोस्ट, व्हिडीओसोबत आपलं लाइव्ह करतात. लाइव्ह व्हिडीओ करत इतर नेटिझन्सशी, आपल्या फॉलोअर्सशी संवाद साधतात. अशीच एक सोशल मीडिया युझर जिने आयुष्यात पहिल्यांदाच लाइव्ह केला पण तीच तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली. तिने दारूच्या नशेत आपलं पहिलं लाइव्ह केलं (Drunk woman social media live streaming) आणि त्यामध्ये तिने जे केलं ते पाहून इतर लोक हैराण झालेच पण ती स्वतःसुद्धा आपला व्हिडीओ पाहून हादरली. यूकेतील लिव्हरपूलमध्ये राहणारी 23 वर्षांची ईवा जोन्स (Eva Jones) 28 डिसेंबरला आपल्या एका फ्रेंडच्या बर्थडे पार्टीला गेली होती. तिथं ती दारू प्यायली. दारूच्या नशेत ती घरी आली आणि का कुणास ठाऊक ती तशाच अवस्थेत सोशल मीडियावर लाइव्ह आली. सुरुवातीला तिने आपल्या फॉलोअर्ससोबत संवाद सुरू केला आणि त्यानंतर तिने जे केलं किंवा तिच्या नकळत जे घडलं ते पाहून नेटिझन्स शॉक झाले. लाइव्ह आल्यानंतर तिने लोकांशी संवाद साधणं अपेक्षित होतं. सुरुवातीला ती बोलत होती, पण नंतर अचानक तिने डोळेच झाकले आणि मग घोरू लागली. लाइव्हमध्येच ईवा चक्क झोपली होती (Woman Slept While Live Streaming). तिचे मित्रमैत्रिणी तिचा हा विचित्र लाइव्ह व्हिडीओ पाहून तिला फोन करत होते. पण तिने आपला फोनही सायलेंट मोडवर ठेवला होता. त्यामुळे तिला काही जाग आली नाही आणि तिने फोन उचलला नाही. हे वाचा - जिच्यासोबत रात्र घालवली ती…; Bra मुळे मोठा उलगडा, तरुणीचं सत्य समजताच तरुण शॉक हे कमी की काय त्यात ईवासोबत झोपेत नकळत असं काही घडलं की ते पाहून सर्वजण शॉक झाले आणि ईवा जेव्हा जागी झाली, शुद्धीवर आली तिला याबाबत समजलं तेव्हा तिला लाज वाटू लागली. लाइव्हमध्ये झोपेत तिने आपली कुस बदलली आणि अचानक तिचं ब्रेस्ट बाहेर आलं. त्यानंतर मॉडरेटरने तिचं लाइव्ह बंद केलं. किती तरी तास ती अशाच अवस्थेत ऑनलाइन होती. इवा कॅमेऱ्यासमोर घोरत राहिली आणि जेव्हा ती जागी झाली, तोपर्यंत तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. शुद्धीवर आल्यानंतर आपला व्हिडीओ पाहून तीसुद्धा हादरली. हे वाचा - ‘एक्स BFसोबत सेक्स..’; गंभीर आजाराने ग्रस्त पत्नीची शेवटची इच्छा ऐकून हादरला पती आपल्या या विचित्र कृत्याबाबत ती म्हणाली, मी याआधी सोशल मीडियावर कधीच लाइव्ह आले नव्हते. दारूच्या नशेत मी लाइव्ह केलं. दारू पिऊन लाइव्ह येण्याचा निर्णय मी का घेतला मला माहिती नाही. पण आता मला पश्चाताप होतो आहे. लाइव्हमध्ये मी कधी झोपले हेसुद्धा मला माहिती नाही.