व्हायरल व्हिडीओ
मुंबई १३ नोव्हेंबर : सोशल मीडिया हा माहिती आणि व्हिडीओचा खजाना आहे. तुम्ही एकदा का इथे आलात की अशा वेगवेगळ्या गोष्टींबद्दल माहिती मिळते की ते जाणून घेण्यात आणि व्हिडीओ पाहाण्यात कसा वेळ निघून जातो, हे आपलं आपल्यालाच कळत नाही. सोशल मीडिया वर आपल्या आवडीच्या विषयाचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यामध्ये काही सायन्स, आर्ट, कॉमेडी, वाईल्ड लाईफ या संदर्भात वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात. सध्या एक वाईल्ड लाईफ संदर्भात एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून या व्यक्तीसोबत घडलेल्या कृत्यावर हसावं की दुख व्यक्त करावं हेच कळणार नाही. हे ही पाहा : नशीब म्हणतात ते हेच का? भरधाव कार येताच… हृदयाचे ठोके चुकवणारा अपघात कॅमेरात कैद आपल्याला हे माहित आहे की दारूच्या नशेत काही लोक असं काही करुन बसतात, ज्याची त्यांना आठवण देखील राहात नाही. तसेच त्यांचं हे कृत्यू त्यांच्या जीवावर बेतू शकतं असा देखील त्यांच्या मनात विचार येत नाही. असंच काहीसं एका काकांनी केलं. दारुच्या नशेत ते बलाढ्य अजगराला देखील घाबरले नाहीत आणि सरळ त्याला आपल्या अंगावर घेतलं. पण त्यानंतर त्यांची जी अवस्था झाली, ती फारच विचित्र आणि धक्कादायक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, झारखंडमधील गढवा येथील किटासोती खुर्द गावातील ही घटना आहे. येथे ५५ वर्षीय बिरजलाल आपल्या मुलासोबत भुयान गावाजवळील कालव्यात मासेमारीसाठी गेले होते. ही व्यक्ती मच्छिमार आहे. ती मासेमारीसाठी गेला असताना हा सर्व प्रकार घडला. यादरम्यान ही व्यक्ती दारु प्यायली होती. असे सांगितले जात आहे की, या काकांना दारुच्या नशेत अजगर आणि माशांमधला फरक समजला नाही. ते अजगराला मासा समजून पकडू लागले. पण लवकरच त्यांचा हा समज चुकीचा ठरतो आणि अजगर आपलं खरं रुप दाखवतो आणि त्या व्यक्तीचा गळा पकडतो.
मद्यधुंद व्यक्ती अजगराशी झटू लागल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. खरंतर या अजगराने या काकांच्या गळ्याला विळखा घातला होता आणि तो आपली पकड घट्ट करु लागला होता. ज्यामुळे हळूहळू या काकांची श्वास कोंडला जाऊ लागला. त्यावेळे तेथे काही लोक जमले आणि त्यांनी या अजगराला काकांपासून लांब करण्याचा प्रयत्न केला. कितीही प्रयत्न केले तरी देखील हा अजगर आपली पकड काही सैल करत नव्हता, पुढे दोन-चार लोक त्यांच्या मदतीला आले. परंतु तरी देखील या काकांना हा अजगर काही सोडत नव्हता. पुढे या अजगराने काकांना सोडलं की नाही हे कळू शकलेलं नाही. परंतु काकांच्या दारु पिण्याच्या सवयीमुळे त्यांना इतक्या मोठ्या संकटात टाकलं होतं हे तर नक्की.
हा धक्कादायक व्हिडीओ ट्वीटरवर Mihir Jha नावाच्या व्यक्तीने ट्वीटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओवर लोकांना भरभरुन लाईक्ल आणि कमेंट केलं आहे.