JOIN US
मराठी बातम्या / Viral / हा कुत्रा की मांजर? VIDEO पाहून भलेभले झाले कन्फ्युझ; तुम्हाला तरी ओळखता येतंय का पाहा

हा कुत्रा की मांजर? VIDEO पाहून भलेभले झाले कन्फ्युझ; तुम्हाला तरी ओळखता येतंय का पाहा

सोशल मीडियावर अशा प्राण्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो कुत्रा की मांजर हे ओळखताच येत नाही आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 08 जानेवारी : अनेकदा आपल्यासमोर अशा काही गोष्टी येतात ज्यामुळे आपण कन्फ्युझ होतो. याला नेमकं काय म्हणावं तेच समजत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्यामध्ये एक प्राणी दिसतो आहे. पण हा कुत्रा आहे की मांजर तेच समजत नाही आहे (Cat or dog video). त्याला ओळखण्यासाठी सोशल मीडियावर जणू चढाओढच लागली आहे (Cat dog video). कुत्रा आणि मांजरांचे सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. तसाच हा व्हिडीओ आहे. पण हा व्हिडीओ कुत्र्याचा आहे की मांजराचा ते काही कळेना. हा व्हिडीओ पोस्ट करणाराही स्वतः कन्फ्युझ झाला आहे. @buitengebieden_  ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे आणि कॅप्शनमध्येच हा कुत्रा की मांजर ते ओळखा असं सांगण्यात आलं आहे. हे वाचा -  ज्याला कुत्रा समजून घरी आणलं, तो निघाला भलताच प्राणी; सत्य समजताच मालकही शॉक आता तुम्ही हा व्हिडीओ नीट पाहा. त्यात एक ब्राऊन रंगाचा प्राणी दिसतो आहे. जो मांजर आणि कुत्रा दोघांसारखा दिसतो आहे. त्याची उंची जास्त नाही आहे. ज्याला पाहताच तुम्ही एकदा मांजर म्हणाल तर एकदा कुत्रा म्हणाल. पण एकच प्राणी दोन्ही कसा काय असू शकतो. आता या दोघांपैकी हा प्राणी नेमका कोणता हेच ओळखायचं आहे.

संबंधित बातम्या

हा व्हिडीओ पाहून तुमच्याप्रमाणेच अनेक जण हैराण झाले आहेत. जो तो यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी याला आधी कुत्रा म्हटलं पण तरी नंतर मांजरही म्हटलं. तर काहींनी याला आधी मांजर म्हटलं आणि नंतर कुत्रा. आता तुम्हाला नेमकं काय वाटतं आहे, हा प्राणी नेमका कोण आहे, हे तुम्हाला समजलं असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या