JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO : लोकलच्या लेडीज डब्ब्यात शिरला श्वान, सीटसोडून महिला पळाल्या

VIDEO : लोकलच्या लेडीज डब्ब्यात शिरला श्वान, सीटसोडून महिला पळाल्या

ट्रेनमधल्या गर्दीमुळे चाकरमान्यांना लोकलमध्ये पाय ठेवण्यासही जागा नसते. या सगळ्या गर्दीत आज सकाळी महिलांच्या डब्यात श्वान शिरला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 जानेवारी : सकाळची वेळ म्हटलं की चाकरमान्यांच्या डोळ्यासमोर येते ती ट्रेनमधली अफाट गर्दी. या गर्दीमध्ये चाकरमान्यांना पाय ठेवण्याचीही जागा नसते. याच  सगळ्या गर्दीत आज सकाळी  महिलांच्या डब्ब्यात श्वान शिरला. गर्दीच्या वेळेस घुसलेल्या या श्वानामुळे महिलांची तारांबळ उडाली होती. सकाळी 8.29च्या मुंबईकडे जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांच्या गर्दीतच श्वान शिरला. भरलेल्या लोकलमध्ये श्वान शिरल्यामुळं काही महिला घाबरून मध्येच उतरल्या तर काहींनी आपली जागा सोडली. लोकलमध्ये चढलेल्या या श्वानाचा अजब व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा- नेहा कक्करनं आर्चीसाठी हिंदीतील सुपरहिट गाणं मराठीत गायलं, VIDEO व्हायरल

संबंधित बातम्या

वाचा- ‘तुझी जादू पाहण्यासाठी पहाटे उठायचो’, कोबी ब्रायंटच्या मृत्यूनंतर विराट भावूक लोकलमध्ये श्वान चढल्यानंतर तो सीट खाली जाऊन बसला त्यामुळं गर्दीच्या वेळीही लोकलमध्ये जागा होती. श्वान सीटच्या खाली बसल्यामुळं महिला घाबरून उभ्याच राहिल्या. महिलांनी श्वानाला बाहेर काढण्याचे अनेक प्रयत्न केले, मात्र तो हलण्यास तयार नव्हता. अखेर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला गाडी थांबल्यानंतर श्वान इतर महिलांबरोबर बाहेर पडला. नकळतपणे श्वानानं मुंबई लोकल प्रवास केला. श्वानासोबत महिलांनीही या प्रवासाचा आनंद घेतला. वाचा- भररस्त्यात तरुण म्हणाला ‘प्रायव्हेट पार्टला हात लाव’, महिलेने काढला फोटो आणि…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या