JOIN US
मराठी बातम्या / Viral / कुत्र्याने पूर्ण केला मुलाचा Home Work; अत्यंत सुंदर असा Video सोशल मीडियावर व्हायरल

कुत्र्याने पूर्ण केला मुलाचा Home Work; अत्यंत सुंदर असा Video सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ पाहून तुम्ही या कुत्र्याच्या प्रेमात पडाल…

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Video Viral : कुत्रा (Dog Best Pet) एक असा पाळीव प्राणी आहे, ज्याच्यावर सर्वजण खूप प्रेम करतात. कुत्रा हा सर्वात जास्त प्रामाणिक आणि विश्वासार्ह प्राणी मानला जातो. मात्र कुत्रा एका मुलाला त्याच्या अभ्यासात मदत करू शकतो असा तुम्ही कधी विचार तरी केलाय का? सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल (Dog Video Viral On Social Media) होत आहे. ज्यात एक कुत्रा मुलाचा होमवर्क करण्यासाठी त्याची मदत करीत आहे. एक कुत्रा आणि मुलाशी संबंधित हा व्हिडीओ तुम्हाला खूप आवडेल. व्हिडीओमध्ये मुलाचा होमवर्क (Home work) पूर्ण करण्यासाठी कुत्रा मदत करताना दिसत आहे. हे ही वाचा- शेजारच्या खोलीतून येत होते विचित्र आवाज; दरवाजा उघडताच कुटुंबाला बसला धक्का हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हक्स नावाच्या या कुत्र्याला मुलाच्या होमवर्कबद्दल फारसं कळत नसेल. मात्र तो त्याच्या शेजारी बसून त्याची मदत करताना दिसत आहे.

संबंधित बातम्या

यादरम्यान मुलगाही त्याच्या अंगावरुन हात फिरवित त्याचे लाड करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि लाइक्स मिळाले आहेत. एका इन्स्टाग्राम युजरने लिहिलं आहे सर्वात सुंदर व्हिडीओ… मुलगा होम वर्क करीत असताना त्याचा कुत्रा त्याला कंपनी देत आहे. त्याचे लाड करीत आहे. त्याचा होमवर्क पूर्ण होत नाही तोपर्यंत तो कुठेही जात नाही. कुत्रा चांगला प्राणी तर असतोच मात्र तो अत्यंत घट्ट मित्रही असतो. हे वेगवेगळ्या व्हिडीओमधून पाहायला मिळत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या