JOIN US
मराठी बातम्या / Viral / 24 तासांची शिफ्ट करून अशी झाली कोव्हिड योद्धाच्या चेहऱ्याची अवस्था, PHOTO पाहून कराल सल्यूट

24 तासांची शिफ्ट करून अशी झाली कोव्हिड योद्धाच्या चेहऱ्याची अवस्था, PHOTO पाहून कराल सल्यूट

जगभरातील डॉक्टर आणि पोलीस फ्रंटलाइन वर्कर म्हणून काम करत आहे. जगभरातील जवळजवळ सर्वच देशांमधील डॉक्टर 24 तास काम करत आहेत.

जाहिरात

भारतातील 0.29 टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत तर 1.92 टक्के रुग्ण आयसीयूमध्ये तर 2.7 टक्के रुग्णांना ऑक्सिजन देण्यात आलेला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 21 जुलै : जगभरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या जगातील एकूण कोरोबाधितांची संख्या 1 कोटीहून अधिक झाली आहे. तर 6 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जगभरातील डॉक्टर आणि पोलीस फ्रंटलाइन वर्कर म्हणून काम करत आहे. जगभरातील जवळजवळ सर्वच देशांमधील डॉक्टर 24 तास काम करत आहेत. त्यामुळे या डॉक्टरांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहेत. अशाच एक कोरोना वॉरिअरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पाकिस्तानमधील एका डॉक्टरचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल असून हा फोटो या महिला डॉक्टरने आपली शिफ्ट संपल्यानंतर टाकला होता. या फोटोमध्ये त्याच्या चेहऱ्यांवर मेहनतीची एक छाप दिसत आहे. हा फोटो बी नुसरत या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या फोटोवर डॉक्टरने, “माझी कोव्हिड-19 मधली शिफ्ट संपल्यानंतर मला कदाचित नवीन चेहऱ्याची गरज भासेल”, असे कॅप्शन दिले आहे. वाचा- बिचारा रिपोर्टर! मास्क न घालता प्रश्न विचारायला गेला, उत्तरात मिळाला ‘कोरोना’

या फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, या फोटोला 43 हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहे. हा फोटो पाहून तुम्हीही या कोरोना वॉरियरला सल्यूट करेल.

जाहिरात

वाचा- ऑक्सफर्डच्या कोरोना लशीमुळे आशा पल्लवित; आता भारतातही होणार ह्युमन ट्रायल मुख्य म्हणजे अनेक भारतीयांनीही या डॉक्टरचे कौतुक केले आहे. लोकांनी या फोटोवर, हे काम धर्माच्या पलीकडे आहे अशी प्रतिक्रीया दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या