JOIN US
मराठी बातम्या / Viral / तरुणाला 20 वर्षांपासून व्हायचा डोकेदुखीचा प्रचंड त्रास; MRI report पाहून डॉक्टरही हादरले

तरुणाला 20 वर्षांपासून व्हायचा डोकेदुखीचा प्रचंड त्रास; MRI report पाहून डॉक्टरही हादरले

शेनजेन इथे राहणाऱ्या या 28 वर्षाच्या व्यक्तीला सतत डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागत असे. हळूहळू वेदना आणखीच वाढत गेल्या आणि त्या वारंवार होऊ लागल्या.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 03 फेब्रुवारी: अनेक लोकांना वर्षानुवर्षे डोकेदुखीची (Severe Headaches) समस्या असल्याचं तुम्ही ऐकलं असेल. काही लोकांसाठी हे दुखणं मायग्रेन किंवा साधं असतं, तर काही ट्यूमरसारख्या आजारांनाही बळी पडतात. मात्र, आजतागायत कोणाच्याही डोकेदुखीचं कारण त्याच्या डोक्यात अडकलेली गोळी असल्याचं समोर आलं नसेल. चीनमधील एका व्यक्तीसोबत मात्र हे खरोखर घडलं. त्याला स्वतःलाही माहिती नव्हतं की त्याच्या डोकेदुखीचं कारण कोणता आजार नसून डोक्यात अडकलेली बंदुकीची गोळी आहे (Bullet Stuck in Skull of a Man for 20 Years). ही अतिशय विचित्र आणि धक्कादायक घटना आहे, मात्र खरी आहे. चीनमधील या व्यक्तीला अनेक वर्षांपासून डोकेदुखीची तक्रार होती. सामान्यतः औषधोपचाराने बरं होणाऱ्या या दुखण्यामागील खरं कारण समोर आलं तेव्हा खुद्द या व्यक्तीलाही आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्या कवटीत दोन दशकांपासून गोळी अडकली होती, याची त्याला कल्पनाही नव्हती. लग्नाच्या एक दिवस आधीच नवरीने दिला बाळाला जन्म; पुढे जे घडलं ते आश्चर्यकारक शेनजेन इथे राहणाऱ्या या 28 वर्षाच्या व्यक्तीला सतत डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागत असे. हळूहळू वेदना आणखीच वाढत गेल्या आणि त्या वारंवार होऊ लागल्या. सुरुवातीला त्याला वाटलं की झोप व्यवस्थित होत नसल्याने असं होत असावं. मात्र झोप घेऊनही हा त्रास कमी न झाल्याने तो डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी त्याची समस्या ऐकल्यानंतर तपासणी केली असता तेदेखील हैराण झाले. Shenzhen University General Hospital मध्ये व्यक्तीच्या MRI रिपोर्टमधून समजलं की त्याच्या कवटीच्या डाव्या बाजूला धातूची गोळी अडकली आहे.

डॉक्टरांनी रुग्णाला जेव्हा याबद्दल विचारलं, तेव्हा त्याला याबद्दल काही कल्पनाही नव्हती की ही गोळी त्याच्या डोक्यात कशी गेली. अखेर त्याने सांगितलं की जेव्हा तो 8 वर्षाचा होता तेव्हा त्याचा भाऊ एअरगनसोबत खेळत होता, चुकून त्याच्याकडून गोळी झाडली गेली. ही गन रुग्णाच्या डोक्यावर ठेवण्यात आलेली होती. यानंतर झालेली दुखापत त्याने आपल्या केसांनी लपवली आणि आई-वडिलांना काहीही सांगितलं नाही. जखमही जास्त खोल नव्हती. त्यामुळे तो स्वतःही याबद्दल विसरून गेला. जिच्यासोबत रात्र घालवली ती…; Bra मुळे मोठा उलगडा, तरुणीचं सत्य समजताच तरुण शॉक डॉक्टरांचं म्हणणं आहे, की या घटनेतून या व्यक्तीचं वाचणं म्हणजे खरंच एक चमत्कार आहे. 1 सेंटीमीटर लांब आणि 0.5 सेंटीमीटर जाड गोळी कवठीमध्ये अडकूनही 20 वर्ष जिवंत राहाणं ही मेडिकल सायन्समधील अतिशय अनोखी घटना असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या