JOIN US
मराठी बातम्या / Viral / तुम्ही देखील फोनच्या सेफ्टीसाठी कव्हर लावता का? पण ते फोनसाठी सेफ नाही तर अनसेफ

तुम्ही देखील फोनच्या सेफ्टीसाठी कव्हर लावता का? पण ते फोनसाठी सेफ नाही तर अनसेफ

फोन चार्जिंग करताना किंवा वापरताना साहजिकच गरम होतो. मोबाईलचे कव्हर्स कडक प्लास्टिक आणि रबराचे असतात.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 23 जानेवारी : बऱ्याच लोकांच्या फोनला कव्हर असतो, बरेच लोक हे फोनच्या सेफ्टीसाठी फोनला कव्हर घालतात. जेणे करुन चुकून जर फोन पडला तर तो जास्त डॅमेज होत नाही किंवा त्याला डेंट पडत नाही. तसेच कव्हर घातल्याने फोनची ग्रीप चांगली राहाते आणि तो हातातून सटकत देखील नाही. फोनला कव्हर घालण्यामागे फोनची सेफ्टी हाच सर्वांच्या मनात विचार असतो. पण असं असलं तरी देखील तो फोनची सेफ्टी नाही उलटं नुकसान करतं. आता तुमच्या मनात असेल की कसं? हे कसं शक्य आहे? चला जाणून घेऊया की एखादे कव्हर तुमचा फोन कसा खराब करू शकतो. हे ही पाहा : फोनवर बोलताना असा आवाज आला तर समजून जा तुमचा फोन रेकॉर्ड होतोय फोन चार्जिंग करताना किंवा वापरताना साहजिकच गरम होतो. मोबाईलचे कव्हर्स कडक प्लास्टिक आणि रबराचे असतात. त्यामुळे फोनमधून निर्माण होणारी उष्णता सहजासहजी बाहेर पडत नाही. या कारणामुळे तुमचा स्मार्टफोन स्लो होतो. जेव्हा तुमच्या फोनवर कव्हर असेल आणि तुम्ही चार्ज करता तेव्हा त्याचा चार्जिंग स्पीड कमी करता येतो. कारण चार्जिंगला ठेवल्यावर फोन गरम होतो आणि जेव्हा उष्णता बाहेर येत नाही तेव्हा बॅटरी चार्ज करण्याचा वेग कमी होतो. फोन गरम झाल्यावर बॅटरीचा चार्जिंग स्पीड कमी केला नाही तर बॅटरीचा स्फोट होण्याचा धोका वाढतो. फोनमध्ये अनेक प्रकारचे सेन्सर आहेत. जेव्हा आपण फोनवर कव्हर ठेवतो तेव्हा ते सेन्सर कव्हर होतात. त्यामुळे फोनचा प्रतिसाद मंद होतो किंवा फोन स्लो होतो आणि कनेक्टिव्हिटीमध्ये समस्या येते.

जेव्हा आपण फोनवर कव्हर लावतो, तेव्हा त्याच्या आत धूळ जमा होऊ लागते. त्यामुळे फोनच्या शरीरावर स्क्रॅश येऊ लागतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या