JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO - प्राण जाए पर मोबाईल ना जाए! धाडकन कोसळला पण हातातला फोन काही सोडला नाही

VIDEO - प्राण जाए पर मोबाईल ना जाए! धाडकन कोसळला पण हातातला फोन काही सोडला नाही

मोबाईलमध्ये बोलण्यात व्यक्ती इतकी दंग होती की…

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 08 सप्टेंबर : मोबाईलसाठी (Mobile) किती तरी जण अगदी आपला जीवही धोक्यात घालतात. अनेकांना आपल्या जीवापेक्षाही प्रिय असतो तो मोबाईल (Mobile video). असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्या एक व्यक्ती धाडकन कोसळली पण तिने स्वतःपेक्षा मोबाईलला वाचवण्यासाठी धडपड केली (Man falling while talking on mobile). आपल्या जीवापेक्षा मोबाईलसाठी धडपडणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. जो पाहून हसावं की रडावं तेच समजणार नाही (Funny video).

व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती स्विमिंग पूलजवळ फिरत मोबाईलवर बोलतो आहे. आपल्या आजूबाजूला काय आहे, याचाही त्याला विसर पडला आहे. मोबाईलवर बोलण्यात तो इतका दंग आहे की चालता चालता तो आपला पाय स्विमिंग पूलमधील पाण्यात टाकतो. त्यावेळी त्याचा तोल ढासळतो. तो घसरतो आणि पाण्यातच पडणार इतक्यात स्वतःला सावरतो. हे वाचा -  OMG! रिअल Donald duck, चक्क माणसासारखा बोलतो हा बदक; पाहा VIDEO पण त्याची ही धडपड स्वतःला पाण्यात पडण्यापासून वाचवण्याची नाही तर चक्क त्याच्या हातातील मोबाईलसाठी आहे, हे स्पष्टपणे दिसतं. तो धाडकन कोसळतो पण हातातला मोबाईल काही पडू देत नाही आणि नंतर सोडत नाही.  पडल्यानंतर तो तसाच उठून स्विमिंग पूलवर बसतो आणि मोबाईलवरच बोलत राहतो. जणू काही झालंच नाही, तसं तो वागतो. हे वाचा -  VIDEO - मोबाईल नंबर मागताच तरुणीने काढली पायातील चप्पल; रोडरोमिओला धू धू धुतलं टिम कॉनवे ज्युनिअर नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शननुसार ही व्यक्ती कॉन्फरन्स कॉलवर होती. हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या