मुंबई, 07 जानेवारी : पूर्वी कपडे हाताने धुतले जायचे. आता कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन (Washing machine video) वापरली जाते. ज्यामध्ये कोणत्याही मेहनतीशिवाय कपडे धुतले जातात. पण तरी सर्वांनाच वॉशिंग मशीन घेणं परवडतं असं नाही. त्यामुळे काही लोक आजही हातांनीच कपडे धुतात. तर काही लोक मात्र वॉशिंग मशीन नसली तरी हातांचा वापर न करता, अंगमेहनतीशिवाय कपडे धुण्याचा जुगाड शोधून काढतातच (Desi jugaad Washing machine video). असाच हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. एका देशी जुगाड वॉशिंग मशीनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. देशी वॉशिंग मशीन पाहून यासमोर भलेभले इंजिनीअर्सही तुम्हाला फेल वाटतील (Drum washing machine). व्हिडीओत पाहू शकता कपडे धुण्यासाठी एका व्यक्तीने देशी जुगाड वापरला आहे. पाण्याच्या ड्रमलाच त्याने वॉशिंग मशीन बनवलं आहे. व्हिडीओत दिसणारा हा निळ्या रंगाचा ड्रम सामान्यपणे बहुतेक लोक पाणी ठेवण्यासाठी या ड्रमचा वापर करतात. पण या व्यक्तीसाठी मात्र हा फक्त पाणी साठवण्याचा ड्रम नाही तर वॉशिंग मशीन आहे. त्याने या साध्या ड्रमला इलेक्ट्रिक मोटार जोडली आणि त्याला वॉशिंग मशीन बनवलं.
the.funny.us नावाच्या इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. हे वाचा - कमालच झाली! चक्क एका माशाने केली Driving; विश्वास बसत नाही तर पाहा हा VIDEO देशी जुगाड वॉशिंग मशीनचा हा पहिला व्हिडीओ नाही. याआधी शाळेतल्या मुलांनीही स्वस्तात मस्त आणि विजेची गरज नाही अशी देशी वॉशिंग मशीन तयार केली होती. Stories 4 Memes इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता.
फक्त एक ड्रम आणि सायकलच्या मदतीने ही मशीन तयार करण्यात आली. वीज नाही तर तुमच्या पायांनी ही मशीन चालते म्हणजे पँडल मारले की मशीनमध्ये टाकलेले कपडे स्वच्छ होऊन बाहेर येतात. हे वाचा - इंजिनिअर का व्हायचंय? चिमुकल्याने दिलेलं उत्तर ऐकून पोट धरून हसाल, VIDEO मीडिया रिपोर्टनुसार हे देशी वॉशिंग मशीन मुलांनी आपल्या एका शाळेच्या प्रोजेक्टअंतर्गत तयार केलं आहे. पण खऱ्या आयुष्यात या मशीनचा वापर खरंच खूप फायदेशीर ठरू शकतो. जे लोक फिटनेस फ्रिक आहेत. म्हणजे नियमित व्यायाम करतात. त्यांच्यासाठी हे मशीन डबल फायदेशीर आहे. म्हणजे या सायकलवर बसून पँडल मारून एक्सरसाईझही होईल आणि सोबतच कपडेही धुवून निघतील. कपड्यांचा मळ आणि तुमच्या शरीराचा फॅट दोन्ही गायब होईल.