JOIN US
मराठी बातम्या / Viral / किती तो निरागसपणा! आधी मेणबत्ती फुकता येत नव्हती, मग जेव्हा फुकली तेव्हा... Video Viral

किती तो निरागसपणा! आधी मेणबत्ती फुकता येत नव्हती, मग जेव्हा फुकली तेव्हा... Video Viral

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. हा व्हिडीओ इतका मस्त आहे की तो पाहूण तुमचा दिवसभराचा थकवा गायब होईल.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 06 डिसेंबर : सोशल मीडिया असं प्लॅटफॉर्म आहे. जिथे आल्यावर तुम्हाला व्हिडीओच व्हिडीओ पाहायला मिळतील. येथील काही व्हिडीओ हे माहिती देणारे असतात. तर काही व्हिडीओ मनोरंजक असतात. काही व्हिडीओ तर इतके सुंदर असतात. जे आपलं मन जिंकतात. अशा व्हिडीओंना आपण पुन्हा पन्हा पाहातो. तसेच त्यांना आपण आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. हा व्हिडीओ इतका मस्त आहे की तो पाहूण तुमचा दिवसभराचा थकवा गायब होईल. हा व्हायरल व्हिडीओ चिमुकल्याचा आहे. जो त्याचा वाढदिवस साजरा करत असतो. जसे आपण सगळे लोक मनात एक इच्छा ठेवून केक कापण्यापूर्वी मेणबत्ती फुकतो. तसंच करण्याचा हा चिमुकला प्रयत्न करतो. पण त्याच्या फुंकर मारल्याने काही मेणबत्ती विझत नाही. त्याची ही फुंकर मारण्याची स्टाईल तुम्हाला खूपच आवडेल. हे ही पाहा : Video : बदकासमोर हुशाऱ्या नकोच, या तरुणासोबत जे घडलं ते पाहून थांबणार नाही हसू हा चिमुकला मेणबत्ती विझवण्यासाठी अनेकदा फुक मारतो, पण अखेर तो आपला हात हलवतो, तेव्हा त्याच्या वाऱ्याने ही मेणबत्ती विझते. जेव्हा ही मेणबत्ती विझते, तेव्हा सगळेच लोक टाळ्या बाजवत असतात. हे पाहून या चिमुकल्याला देखील कुतुहल वाटतं आणि तो खुदकन हसतो आणि सर्वांसोबत टाळ्या वाजवू लागतो.

संबंधित बातम्या

हा व्हिडीओ खूपच क्युट आहे, त्याच या चिमुकल्याची रिएक्शन तर त्याहूनही क्यूट आहे. म्हणून तर या व्हिडीओने नेटकऱ्यांना वेड लावलं आहे.

ट्वीटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला मिलियन्समध्ये व्ह्यूज मिळाले आहेत, तर असंख्य लाईक्स आणि शेअर्स आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या