JOIN US
मराठी बातम्या / Viral / जोडप्याचं विचित्र कृत्य; चालत्या बाईकवर करु लागले अशी गोष्ट... Video पाहून सगळ्यांना बसला धक्का

जोडप्याचं विचित्र कृत्य; चालत्या बाईकवर करु लागले अशी गोष्ट... Video पाहून सगळ्यांना बसला धक्का

चालत्या बाईक वरुन एक तरुण जोडपं प्रवास करत होतं. एवढंच नाही तर त्यांची प्रवास करण्याची पद्धत फारच चुकीची होती.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 02 जानेवारी : सोशल मीडियावर नेहमीच असे काही व्हिडीओ समोर येत असतात, जे आपल्याला आश्चर्यचकीत करतात. सध्या असाच एक विचित्र व्हिडीओ समोर आला आहे. जो ट्राफीक नियमांचं उल्लंघन करत आहे. शिवाय हे कृत्य धोकादायक देखील आहे. मागून येणाऱ्या एका कारमधून हा व्हिडीओ काढला गेला. जो नंतर ट्वीट देखील करण्यात आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली. पोलिसांनी आरोपी तरुण जोडप्यावर कडक कारवाई केली आहे. हे ही पाहा : Video : ‘यमराज सुट्टीवर होता वाटतं?’’, झाडाखाली उभ्या असलेल्या तरुणासोबत घडलेला प्रकार पाहून तुम्ही देखील हेच म्हणाल चालत्या बाईक वरुन एक तरुण जोडपं प्रवास करत होतं. एवढंच नाही तर त्यांची प्रवास करण्याची पद्धत फारच चुकीची होती. जे ट्राफिक नियमांचं उल्लंघन करत होतं. या व्हिडीओमध्ये तरुण बाईक चालवत आहे आणि त्याच्यापुढे एक तरुणी बसली आहे. जी त्याला मिठी मारत आहे. असे दिसत आहे की या जोडप्याने दारु प्यायली होती. ज्यामुळे तसंही ड्रिंक ऍन्ड ड्राइव्ह केसमध्ये त्यांनी ट्राफिकच्या नियमांचं उल्लंघन केलं होतं. शिवाय अशा विचित्र पद्धतीने गाडी चालवणे देखील चुकीचे आहे.

संबंधित बातम्या

विशाखापट्टणममधील स्टील प्लांट रोडवर कथितरित्या शूट केलेल्या व्हिडीओमध्ये, एक 19 वर्षांची मुलगी आणि 22 वर्षांचा मुलगा हे सार्वजनीक ठिकाणी असं कृत्य करत होते. तरुणाने तरुणीला बाईकच्या टाकीवर बसवले आणि मिठी मारायला सुरुवात केली. दुचाकीवर मिठी मारणाऱ्या तरुण जोडप्याचा व्हिडीओ जवळून जाणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीने त्याच्या फोनमध्ये कैद केला होता. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध चुकीच्या पद्धतीने गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही दुचाकी स्टील प्लांट पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिसांनी मोटार वाहन कायद्याच्या कलम 336, 279, 132 आणि 129 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या जोडप्याच्या पालकांनाही बोलावून त्यांना याबाबत ताकीद दिली गेली आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, विशाखापट्टणमचे पोलिस आयुक्त सीएच श्रीकांत यांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला आणि कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांना वाहन जप्तीसह कठोर शिक्षेचा इशारा दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या