मुंबई 25 ऑगस्ट : चोरीच्या घटना दिवसेंदिवस खूप वाढू लागल्या आहेत. यामध्ये मोबाईल, पाकिट चोरी तसेच गाडी चोरीच्या प्रमाणात मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. यासंदर्भातील अनेक व्हिडीओ देखील आपण सोशल मीडियावर पाहिले आहे. या व्हिडीओमुळे आपल्याला लक्षात येते की कशाप्रकारे हे चोर चोरी करण्याची वेगवेगळी पद्धत अवलंबतात. खरंतर टेक्नोलॉजी प्रमाणे लोक बदलले आहेत आणि त्यामुळे चोर त्याहून अधीक हुशार झाले आहेत. ते कधी कोणत्या गोष्टींचा वापर करुन चोरी करतील याचा काही नेम नाही. या संदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये तुम्ही एक अनोखी चोरी पाहू शकता. या व्हिडीओमध्ये एक कपल बाईकची चोरी करत आहे. परंतु त्यांच्या चोरी करण्याची पद्धत जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला हसू येईल. येवढंच काय तर सुरुवातीला तुमच्या लक्षात देखील येणार नाही की, हे कपल चोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. नक्की कशी केली बाईकची चोरी? या व्हिडीओमध्ये एक तरुणी आणि तरुण दोघेही फोनवर बोलण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे. ते कदाचित काही वेगवेगळ्या लोकांशी बोलत असावेत किंवा एकमेकांना ओळखत देखील नसावेत असंच वाटत आहे. हे वाचा : Video : चोरी करण्याची ‘ही’ पद्धत पाहा आणि सावध व्हा, तुमच्यासोबत ही घडू शकते अशी गोष्ट आधी ही तरुणी फोनवर बोलत बाईक पार्क केलेल्या ठिकाणी पोहोचते. तिच्या हातात एक चावी असते, ही चावी ती तरुणी पार्किंगमध्ये असलेल्या एक-एक बाईकला लावून पाहाते. जेव्हा ही चावी बाईकला लागत नाही, तेव्हा ती समोरी तरुणाला याबाबत खूणावते आणि पुढच्या बाईककडे जाते.
ही तरुणी असा प्रकार तीन ते चार वेळा करते. अखेर शेवटच्या बाईकला ती चावी लागते. ज्यानंतर ही तरुणी त्या तरुणाला खुणावते. तर हा तरुण त्या बाईककडे येतो आणि या बाईकवर बसतो. अखेर हे दोघेही बाईक घेऊन तेथून फरार होतात. हे वाचा : VIRAL VIDEO : गोष्टीतील टोपीवाल्यापर्यंत ठीक आहे, पण खऱ्या आयुष्यात माकडाने पळवली पोलिसाची टोपी, मग काय झालं आपण विचारसुद्धा करू शकत नाही चोरीशी संबंधित हा व्हिडीओ videonation.teb नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी जोरदार कमेंट्स केल्या आहेत. ज्यामध्ये लोकांना सावध राहाण्यासाठी देखील सांगण्यात आले आहे. तर काही लोक या जोडप्याने वापरलेल्या ट्रीकचं कौतुक करत आहेत. त्यांची ही चोरीची ट्रीक अनेकांना आवडली आहे.