JOIN US
मराठी बातम्या / Viral / या जवानाला कडक सॅल्युट! लॉकडाऊनमध्ये झाला 2 मुलांचा शिक्षक

या जवानाला कडक सॅल्युट! लॉकडाऊनमध्ये झाला 2 मुलांचा शिक्षक

पोलिस कॉन्स्टेबल क्वारंटाईन सेंटरमध्ये कार्यरत आहेत. त्यांची 12 तासांची ड्युटी संपली की ते या बहिण- भाऊ असलेल्या दोन मुलांना शिकवण्याचे काम करतात.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 मे : काही दिवसांपूर्वी मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून एका शिक्षकानं चक्क झाडावर आपले ऑनलाईन क्लास सुरू केल्याचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर आता एका जवानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोरोनामुळे आलेल्या महासंकटाचा सामना करण्यासाठी आपले डॉक्टर आरोग्य सेवा, पोलीस आणि जवान कायमच पुढे आहेत. गरिब, मजूर कामगार इतकच नाही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना जवानांकडून मदत केली जात असल्याचे अनेक फोटो आपण पाहिले पण हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होण्यामागचं कारण थोडं वेगळं आहे. या महासंकटात पोलीस अहोरात्र मेहनत करून आपली महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहेत. याच दरम्यान बहिण भाऊ असलेल्या दोन मुलांना शिकवण्याचं कामं हे पोलीस कॉन्स्टेबलनं केलं आहे. उत्तराखंडमधील पंतनगर परिसरात राहणाऱ्या गरिब कुटुंबातील या दोन मुलांना शिकवण्याचं काम या कॉन्स्टेबलनं केलं आहे. रस्त्याच्या कडेला बसून ड्युटीनंतरच्या वेळेत हे या मुलांना शिकवतात. त्यांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

संबंधित बातम्या

हे वाचा- ‘अशी पुढे जाणार अर्थव्यवस्था’, आनंद महिंद्रांनी शेअर केला ट्रॅक्टरचा जुगाड VIDEO उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री असलेले रमेश पोखरियाल निशंक यांनी हे ट्विट केले आहे. ते लिहितात, ‘कोरोना साथीच्या या जागतिक संकटामध्ये आमचे पोलिस महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. उत्तराखंडमधील रुद्रपूर येथे तैनात कॉन्स्टेबलने, वाचन करण्याची हौस पाहून पंतनगरमधील दोन गरीब भावंडांसाठी रोड इथे शिकवणी सुरू केली आहे’ मिळालेल्या माहितीनुसार हे पोलिस कॉन्स्टेबल क्वारंटाईन सेंटरमध्ये कार्यरत आहेत. त्यांची 12 तासांची ड्युटी संपली की ते या बहिण- भाऊ असलेल्या दोन मुलांना शिकवण्याचे काम करतात. आतापर्यंत या पोलिस कर्मचार्‍याचे नाव समोर आले नाही परंतु सोशल मीडियावर युझर्सनी त्यांचं कौतुक केलं आहे. इतके तास कर्तव्य बजावूनही न कंटाळता गरीब कुटुंबातील मुलांना शिकवत आहेत. हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. हे वाचा- मांजर आणि साप आले समोरासमोर…लढाईत कोणी मारली बाजी, पाहा कधीच न पाहिलेला VIDEO संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या