मुंबई, 28 मार्च : देशभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरू आहे. आतापर्यंत 800 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान हा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. संपूर्ण लॉकडाऊन असलं तरीही अत्यावश्यक सेवा सुरू असल्यानं लोक बाहेर जीवनावश्यक गोष्टी घेण्यासाठी लोक बाहेर पडत आहेत. 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासंदर्भात घोषणा केली.लोकांनी लॉकडाऊन गांभीर्यानं घेतलं नाही. जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी लोकांनी किराणा दुकानाबाहेर येऊन वस्तू घेण्यासाठी बाहेर येतात. पोलिसांनी दरवेळी आवाहन करूनही लोक ऐकत नाहीत. त्यावर राजस्थानमधील करौलीचे एसपी अनिल बेनीवाल यांनी कठोर शब्दात नागरिकांना आवाहन केलं आहे. सोशल मीडिया या व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ भारतीय वनसेवा अधिकारी प्रवीण कासवान यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘‘करौलीचे एसपी अनिल बेनीवाल यांनी वास्तविक मुद्दे ठेवून लॉकडाऊनला पाठिंबा दर्शविला. ऐका आणि अनुसरण करा, कृपया घरीच रहा. सरकारी अधिकाऱ्यांना अनावश्यक ताण देऊ नका.’’ असं कॅप्शन देऊन कासवान यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. ट्विटरवर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या या व्हिडीओला 4 हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 300 हून अधिक लोकांनी लाईक केला आणि आणि 100 हून अधिक लोकांनी रिट्वीट केला आहे. हे वाचा- पोलिसाच्या मुलाने फोडला हंबरडा, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील हे वाचा- आयसोलेशन वॉर्डमधील भीतीदायक 12 दिवस, कोरोनाची लढाई जिंकलेला रुग्ण म्हणाला…