JOIN US
मराठी बातम्या / Viral / काय सांगता? या ATM मशीनमधून निघते चक्क तयार केलेली पाणीपुरी, काय आहे प्रकार वाचा

काय सांगता? या ATM मशीनमधून निघते चक्क तयार केलेली पाणीपुरी, काय आहे प्रकार वाचा

ही पाणीपुरी मशीन एटीएमप्रमाणे काम करते. ही मशीन तयार करण्यासाठी आम्हाला 6 महिने लागले.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 03 जुलै : लॉकडाऊनमुळे पाणीपुरीचे ठेले बंद झाले. त्यामुळे पाणीपुरी खाण्याची इच्छा झाली ठेल्यावर जाऊन खाणं शक्य नाही त्यामुळे घरीच पाणीपुरीचे बेत केले जात होते. पण अनेक जणांनी पाणीपुरी मिस केलं. पण आता तुम्हाला आता सहज पाणीपुरी खाणं शक्य होणार आहे. एटीएममधून आता पैशांऐवजी पाणीपुरी आली तर किती मस्त. पैसे निघणाऱ्या एटीएम मशीनमधून पाणीपुरी येणार असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ही पाणीपुरी तयार करणारी मशीन लवकरच बाजारात लाँच करण्यात येणार आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पाणीपुरीचे ठेले बंद झाले आणि अनेकांनी पाणीपुरी मिस केली. मात्र आता ही तुम्हाला लवकरच खाता येणार आहे. हे मशीन कसं असेल आणि काय प्रॉसेस असेल याबाबत लवकरच आणखीन माहिती समोर येणार आहे. हे वाचा- VIDEO: माज उतरवला! चिनी सैन्याच्या खतरनाक स्टंटला असं दिलं भारतीयांनी उत्तर

संबंधित बातम्या

हे वाचा- VIDEO : समुद्र किनाऱ्यावर सुरू होतं Wedding Photoshoot, एक लाट आली आणि… या मशीनची सिस्टीम एटीएमसारखी आहे. ‘ही पाणीपुरी मशीन एटीएमप्रमाणे काम करते. ही मशीन तयार करण्यासाठी आम्हाला 6 महिने लागले. सुरुवातील प्रथम स्टार्ट बटण दाबा. मग पैसे निवडा. म्हणजे किती पैशांची पाणीपुरी खायची आहे तेवढे पैसे मशीनमध्ये टाका आणि एक-एक पाणीपुरी खायला सुरुवात करा. संकलन, संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या