JOIN US
मराठी बातम्या / Viral / ... आणि जेव्हा SP ने स्वत: ट्रॅक्टरला मारला धक्का, VIDEO VIRAL

... आणि जेव्हा SP ने स्वत: ट्रॅक्टरला मारला धक्का, VIDEO VIRAL

लॉकडाऊनमध्ये रस्त्यात शेतकऱ्याचा बंद पडला ट्रॅक्टर, SP सह पोलीस पथकानं मारला धक्का

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सुलतानपूर, 19 एप्रिल : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. कोरोना विरुद्ध लढण्यासाठी पोलीस, आरोग्य सेवा अहोरात्र काम करत आहेत. या महासंकटात पोलीस वेळोवेळी देवदूतासारखे धावून येत आहेत. कधी गरजूंना खायला देऊन तर कधी मदत पोलीस वेगवेगळी भूमिका बजवताना पाहायला मिळत आहेत. उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यात अशाच संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला पोलिसांनी मदत केली आहे. त्याचा ट्रॅक्टर अचानक रस्त्यात बंद पडला आणि ट्रक्टरमध्ये कापलेलं पीक होतं. काय करावं सुचेना तिथे असलेल्या पोलिसांनी या शेतकऱ्याला मदत केली आहे. सुलतानपूर जिल्ह्यात एक शेतकरी उसाचा ट्रॅक्टर घेऊन होता. भररस्त्यात लॉकडाऊनदरम्यान ट्रॅक्टर बंद पडला. धक्का मारल्याशिवाय सुरू होणार नाही. आता काय करावं या चिंतेत असतानाच पोलिसांनी त्याला मदतीचा हात दिला. एसपीसह त्यांच्या पथकानं शेतकऱ्याला ट्रॅक्टरला धक्का मारण्यासाठी मदत केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे वाचा- 20 एप्रिलपासून मोबाइल रिचार्जची दुकानं सुरू होणार? जाणून घ्या काय आहे योजना

संबंधित बातम्या

18 एप्रिलला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भावुक करणारा हा व्हिडीओ आहे. मीना जिल्ह्यात एसपी शिवहरी दौर्‍यावर होते. यावेळी ते कुरेभार पोलीस स्टेशन परिसरातील जामोली चेकपोस्ट येथे पोहोचले. तिथे ऊसानं भरलेला ट्रॅक्टर बंद पडला होता त्याला धक्का मारण्यासाठी पोलिसांनी मदत केली आहे. हे वाचा- सांस्कृतिक कार्यक्रम, रेल्वे बंद; मुख्यमंत्री संवादातील 15 महत्त्वाचे मुद्दे संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या