JOIN US
मराठी बातम्या / Viral / कोरोना कशाला जिवंत राहतोय? कॅशिअर इस्त्री घेऊनच बसलाय, पाहा VIDEO

कोरोना कशाला जिवंत राहतोय? कॅशिअर इस्त्री घेऊनच बसलाय, पाहा VIDEO

कोरोनापासून वाचण्यासाठी नवनवे उपाय करत आहेत. असाच एक भारतीय जुगाड असलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 एप्रिल : देशात लॉकडाउन असल्यानं सर्वच लोक आता घरात आहेत. मात्र अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात आल्या आहेत. कोरोनाची भीती असतानाही अशा सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे काम करावे लागत आङे. त्यांनाही कोरोनाची भीती आहेच. मात्र यासाठी लोक खबरदारीही घेत आहेत. कोरोनापासून वाचण्यासाठी नवनवे उपाय करत आहेत. आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. गुजरातमध्ये एका बँक कर्मचाऱ्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. आयपीएस अधिकाऱ्याने हा व्हिडिओ शेअर करताना म्हटलं की, या बँक कॅशिअरला सलाम, सगळ्या व्हायरसला मारत आहे.

संबंधित बातम्या

व्हायरल व्हिडिओमध्ये बँक कर्मचारी पावती चिमट्याने पकडताना दिसतो. एवढंच नाही तर पावतीवर इस्त्रीही फिरवतो. त्यानंतर ग्लोव्हज घातलेल्या हातांनी पावती धरून पुढचं काम करतो. यासाठी त्याने टेबलावरच इस्त्री ठेवली आहे. कोणतीही पावती आली तर ती चिमट्यानं पकडून टेबलवर ठेवतात आणि नंतर त्याला इस्त्री करतात. हे वाचा : खरं की खोटं : प्रखर सूर्यप्रकाश आणि UV किरणं कोरोनाला नष्ट शकतात का? कोरोनाची धास्तीच लोकांनी एवढी घेतली आहे की आता यात कोणताही धोका पत्करण्याची त्यांची इच्छा नाही. भारतात अशा वेळी जुगाड करणाऱ्यांचीही कमी नाही. याआधीही नवरा बायकोचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात पत्नी पतीला 2 फूट लांब राहूनच जेवण वाढत असल्याचं दिसतं. हे वाचा : 2 फूट लांबून पत्नीनं वाढलं जेवण; पतीनं मारला डोक्यावर हात, पाहा VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या