ब्रुकलिन, 29 मार्च : जगभरात कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन आहे. प्रत्येक देशातील सरकारने नागरिकांना घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. होम क्वारंटाइन असल्यामुळे प्रत्येकजण आपापला दिवस नवनवीन विरंगुळ्यात घालवत आहे. सोशल मीडियावर तर Quarantine Day बाबत शेकडो मीम्स व्हायरल होत आहेत. तर प्रत्येक जण सोशल मीडियावरच त्यांच्या दिवस कसा गेला याबाबतचे व्हिडीओ शेअर करत आहेत. असाच एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. घराबाहेर पडता येत नसल्यामुळे एका मुलाने मुलीला नंबर देण्यासाठी ड्रोनचा वापर केला आहे आणि त्यामध्ये त्याला यशसुद्धा आले आहे. हा व्हिडीओ अनेक सोशल मीडिया युजर्सना आवडल्यामुळे त्यांनी तो शेअर देखील केला आहे. (हे वाचा- बादशाहचा नवीन म्युझिक VIDEO ‘गेंदा फूल’ लाँच, जॅकलिन दिसली हॉट बंगाली लुकमध्ये ) सेल्फ क्वारंटाइन असणाऱ्या जेरेमी कोहेन नावाच्या एका ब्रुकलिनमधील मुलाचा हा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये त्याने ड्रोनच्य मदतीने एका मुलीपर्यंत त्याचा मोबाइल नंबर पोहोचवला आहे. त्याठिकाणच्या मीडिया अहवालानुसार या मुलीने तासाभराने त्याला मोबाइलवर मेसेज देखील केला आहे. या संपूर्ण घटनेचा टिकटॉकवर व्हिडीओ बनवून त्याने ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे.
‘मला स्वत:लाच विश्वास नाही..’ असं कॅप्शन देत त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. 3 लाख 80 हजार युजर्सपेक्षा जास्त जणांनी हा व्हिडीओ लाइक केला असून 83 हजारहून अधिक जणांनी रिट्विट केला आहे. 5 लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.