JOIN US
मराठी बातम्या / Viral / क्वारंटाइन सेंटरमध्ये रंगला क्रिकेटचा सामना, माजी मुख्यमंत्र्यांनी शेअर केला VIDEO

क्वारंटाइन सेंटरमध्ये रंगला क्रिकेटचा सामना, माजी मुख्यमंत्र्यांनी शेअर केला VIDEO

37 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता क्वारंटाइन सेंटरमध्ये क्रिकेटचा सामना रंगला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

श्रीनगर, 11 जून : कोरोनाचं भारतासह जगभरात थैमान सुरू आहे. कोरोना संशयितांना आणि नुकत्याच प्रवास करून आलेल्यांना क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठवण्यात येत आहे. या क्वारंटाइन सेंटरमध्ये (Quarantine Centre) घडणाऱ्या अनेक गमती-जमती आणि मनोरंजन करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (VIRAL) होत आहेत. असाच एक क्वारंटाइन सेंटरमधील व्हिडीओ जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांनी शेअर केला आहे. 37 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता क्वारंटाइन सेंटरमध्ये क्रिकेटचा सामना रंगला आहे. तिथले लोक उत्साहात सोशल डिस्टन्सचं पालन करून हा क्रिकेट खेळत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. काही लोक आराम करत आहेत तर काही जण मोठ्या उत्साहात हा सामना खेळत आहेत असं दृश्यं पाहायला मिळत आहे.

हे वाचा- खरं आहे की खोटं: 15 जूननंतर देशभरात पुन्हा लागू होणार कडक लॉकडाऊन?

संबंधित बातम्या

जाहिरात

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी बुधवारी हा व्हिडीओ ट्वीट केला होता. हा व्हिडीओ आतापर्यंत 1 लाखहून अधिक वेळा पाहण्यात आला आहे तर 500 हून जास्त लाइक्स आणि 400 हून अधिक रिट्वीट करण्यात आला आहे. जागा मिळाली तर खेळणार. क्वारंटाइन टाइम पास असं कॅप्शन देऊन हा व्हिडीओ उमर अब्दुल्ला यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हे वाचा- कोरोनामुळे तरुणांसमोर मोठं संकट, पिंपरी चिंचवडसह इतर भागातही अनेकांच्या नोकऱ्या हे वाचा- बापरे! कोरोना व्हायरसमुळे जगात होऊ शकतो 10 कोटी लोकांचा मृत्यू संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या