जर तुम्ही कोणत्याही अॅडल्ट वेबसाईटवर जाऊन एखादं फाईल डाउनलोड केलं तर तुमच्या डिव्हाईसमध्ये मालवेअर (Malware) प्रवेश करू शकतो
नवी दिल्ली 23 एप्रिल : अमेरिकेमध्ये नेहमीच काही ना काही विचित्र गोष्टी होत असतात. आता तिथल्या एका कॉलेजने आपल्या अभ्यासक्रमात चक्क पॉर्नोग्राफीचा (Pornography in college syllabus) समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉलेजमध्ये असलेल्या ‘फिल्म 300’ या कोर्सचा एक भाग म्हणून ‘हार्डकोअर पॉर्नोग्राफी’चा (Hardcore pornography in syllabus) समावेश करण्यात आला आहे. यासाठी विद्यार्थ्यांना तीन क्रेडिट्स मिळणार आहेत. सोशल मीडियावर या निर्णयाबाबत विविध प्रकारच्या प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत. विद्यार्थी एकत्र बसून पाहणार पॉर्न उटाह (Utah) राज्यातल्या सॉल्ट लेक सिटीमध्ये (Salt Lake City) असणाऱ्या वेस्टमिन्स्टर कॉलेजने (Westminster college) हा कोर्स सुरू केला आहे. या कोर्ससाठी विद्यार्थ्यांना लेक्चररसोबत एकत्र बसून X-रेटेड मूव्हीज आणि पॉर्न फिल्म्स पाहाव्या लागणार आहेत. पॉर्न पाहिल्यानंतर विद्यार्थी त्यातले वर्ण, क्लास आणि जेंडरचे या अनुषंगाने सेक्शुअलायझेशन याबाबत चर्चा करतील. हे विद्यार्थी पॉर्नकडे एक प्रायोगिक, मूलगामी कलाप्रकार (College claims porn is an art form) म्हणून पाहतील, असं या कोर्सच्या माहितीमध्ये म्हटलं आहे. ‘डेली स्टार’च्या हवाल्याने लॅड बायबल या वेबसाइटने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ‘त्या’ अवयवामुळे तरुणीला एकही लाइफ पार्टनर मिळेना; म्हणे, ‘तिथं नजर जाताच पुरुषांनाही वाटते लाज’ कॉलेजची काय प्रतिक्रिया वेस्टमिन्स्टर कॉलेजने (Westminster college pornography course) केएसएल न्यूज रेडिओला याबाबत आपली प्रतिक्रिया दिली. “सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी आम्ही वेळोवेळी अशा प्रकारचे इलेक्टिव्ह कोर्स आणत असतो. केवळ वेस्टमिन्स्टरच नाही, तर देशातली अनेक कॉलेजेस आणि विद्यापीठं अनेकदा पॉर्नोग्राफीसारख्या संभाव्य आक्षेपार्ह विषयांची व्यापकता आणि प्रभाव जाणून घेण्यासाठी परीक्षण करत असतात. काही जणांना या कोर्सची माहिती (America college pornography course) चिंताजनक वाटू शकते; मात्र या दिलेल्या माहितीमुळे विद्यार्थ्यांना आपल्याला अशा वादग्रस्त विषयांच्या गंभीर सर्वेक्षणात सहभागी व्हायचं आहे की नाही हे ठरवण्यास मदत होते,” असं मत कॉलेजकडून व्यक्त करण्यात आलं. ‘अग्नी खेळी’दरम्यान एकमेकांवर जळत्या मशाली फेकताना दिसले लोक; भयानक VIDEO, नेमका काय आहे प्रकार? ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस या अभ्यासक्रमाबाबत माहिती समोर येताच ट्विटरवर त्याबाबत विविध प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काही जणांनी याचा स्वीकार केला; मात्र बहुतांश जणांनी त्यावर टीका केली आहे. ‘हा कोर्स म्हणजे निव्वळ कचरा आहे’, ‘एकत्र बसून वर्गात पॉर्न पाहणं हे अगदी घृणास्पद आहे’, ‘मला वाटलं होतं, की हे कॉलेज चांगलं असेल’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ट्विटर युझर्सनी (Twitter reacts to Westminster college decision) दिल्या आहेत. एका ट्विटर युझरने म्हटलं आहे, की “जगात असे अनेक प्रश्न आहेत, की जे तातडीने सोडवण्याची गरज आहे, तसंच जगात कित्येक चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी उपलब्ध आहेत. असं असताना वेस्टमिन्स्टर कॉलेज आपल्या विद्यार्थ्यांसमोर या कचऱ्याचा पर्याय देतंय, हे धक्कादायक आहे.” दुसऱ्या एका ट्विटर युझरने पॉर्नला हे कॉलेज ‘कलाप्रकार’ म्हणत असल्याबाबत आश्चर्य व्यक्त केलं. एकूणच कॉलेजचा हा कोर्स नेटकऱ्यांच्या पचनी पडलेला नाही. या कोर्सला आता विद्यार्थी कसा प्रतिसाद देतात, आणि कॉलेज पुढे तो कायम ठेवतं का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.