प्रतिकात्मक फोटो
मुंबई 11 जानेवारी : पेट्रोल किंवा डिझेल कारपेक्षा सीएनजी वाहने अधिक इंधन कार्यक्षम मानली जातात. तसेच यामुळे पैसे वाचतात. ज्यामुळे बरेचसे लोक या पर्यायाकडे वळले आहेत. पण असं असलं तरी देखील सीएनजी कार चालकांना आणखी एका गोष्टीला सामोरं जावं लागतं, ते म्हणजे सीएनजी भरण्यासाठीची लांबच-लांब रांग. त्यातही जर तुमची सीएनजी कार कमी मायलेज देऊ लागली तर तुमची खूप निराशा होईल. तुम्हीही सीएनजीवर चालणारी कार वापरत असाल तर, आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत, ज्या ऐक्सपर्टनी सांगितल्या आहेत. ज्या तुमचं मायलेज वाढवण्यासाठी मदत करु शकतात. हे ही पाहा : Credit Card वापरणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कर्जाची परतफेड कोण करतं? 1. सीएनजी टाकी शक्य तितकी भरलेली ठेवा. जेणेकरून तुम्ही सीएनजीद्वारे लांबच्या प्रवासाला जाऊ शकता आणि पेट्रोलवर धावण्याची गरज नाही. 2. इंजिन व्यवस्थित ठेवा. तसेच त्याला सर्विस करत राहा. जर इंजिन योग्यरित्या काम करत असेल तर तुम्हाला मायलेज देखील चांगले मिळेल. 3. टायरमधील हवेची पातळी योग्य असावी. कमी फुगलेले टायर्स किंवा हवा गेलेल्या टायरमुळे, इंजिनला अधिक मेहनत करावी लागते, ज्यामुळे मायलेज कमी होतं.
4. वेगाने वाहन चालवणे टाळा. वेगाने गाडी चालवल्यामुळे गाडीची स्पीड कधी खूप जास्त तर कधी खूप कमी होते. यामुळे तुमच्या कारच्या इंधनावर परिणाम होतो. एकाच वेगात गाडी ठेवल्याने तुमचा मायलेज वाचेल. 5. तुमच्या कारमध्ये जास्त वजन ठेवू नका. तुम्ही जितके जास्त वजन वाहून नेत आहात तितके तुमच्या इंजिनला काम करणे अधिक कठीण होते. ज्यामुळे तुमच्या कारची इंधन कार्यक्षमता कमी होऊ शकते.