मुंबई, 15 जुलै : गाय जितकी शांत तितकाच बैल हा रागिष्ट असतो. बैल चवताळला तर तो काय करू शकतो, हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. बैलाच्या हल्ल्याचे असे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तुम्ही असे व्हिडीओ पाहिले असतील. प्रत्यक्षात किंवा टीव्हीवरही तुम्ही बैलांनी माणसांवर केलेले हल्ले पाहिले असतील. अशाच संतप्त बैलांच्या हल्ल्याचा एक भयंकर व्हिडीओ समोर आला आहे. एक-दोन नव्हे तब्बल तीन-तीन बैलांनी एकाच वेळी एका महिलेवर खतरनाक हल्ला केला आहे (Bull attack on woman). एका बैलाने हल्ला केला तरी त्या व्यक्तीची काय अवस्था होते, ते तुम्हाला माहिती आहे. मग विचार करा, तीन बैलांनी एकत्र हल्ला केल्यानंतर या महिलेची काय अवस्था झाली असेल. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ पाहूनच तुमच्या अंगावर काटा येईल. हे वाचा - जीवापेक्षा सेल्फी हवा! पुरात बुडाली तरी पाण्याबाहेर हात ठेवून शूट करत राहिली VIDEO फक्त 15 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओत पाहू शकता तीन बैल रस्त्यावर उभे असलेले दिसत आहेत. तसे बैल शांतपणे उभे आहेत. त्यामुळे एक महिला त्यांच्यामधून जाते. त्याचवेळी एक बैल सुरुवातीला त्या महिलेच्या दिशेने धावून येतो आणि तिच्यावर हल्ला करतो. तिला आपल्या शिंगांने उडवतो. त्यानंतर तिथे उभे असलेले इतर बैलही तिथं येतात.
तिन्ही बैल त्या महिलेला तिन्ही बाजूने घेरतात आणि तिच्यावर एकत्र हल्ला करतात. बैलांच्या हल्ल्यानंतर महिला जमिनीवर कोसळते. तेव्हा ते बैल तिला आधी आपल्या शिंगांनी मारत नंतर तिला आपल्या पायाखाली चिरडतात. जो बैल तिच्यावर पहिल्यांदा हल्ला करतो तो तिच्या अंगावरून तिला तुडवत दुसऱ्या बाजूला जातो. महिलेच्या शरीरात काहीच हालचाल होताना दिसत नाही. त्यानंतर काही लोक तिच्या मदतीसाठी धावत येतात. तेव्हा बैल बाजूला होता. हे वाचा - VIDEO - एकमेकींच्या झिंझ्या उपटल्या, काठीने बदडलं; एका बॉयफ्रेंडसाठी भररस्त्यात तरुणींची Fighting इरफान नावाच्या व्यक्तीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. पोस्टनुसार ही घटना राजस्थानच्या जोधपूरमधील असल्याचं सांगण्यात आलं आहे.