हार्ट अटॅक आलेल्या रुग्णाचा जवानाने वाचवला जीव.
चेन्नई, 27 सप्टेंबर : पोलीस असो वा जवान नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात. आपल्या जीवाची बाजी लावून पोलीस आणि जवानांनी सामान्य नागरिकांचा जीव वाचवल्याच्या बऱ्याच घटना समोर आल्या आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एका सीआयएसएफ जवानाने विमानतळावर एका प्रवाशाचा जीव वाचवला आहे. तामिळनाडूच्या चेन्नई विमानतळावरील हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. विमानतळावर एका प्रवाशाला हार्ट अटॅक आला. त्याचवेळी तिथं असलेल्या सीआयएसएफ जवानाने क्षणाचाही विलंब केला नाही आणि त्या प्रवाशाला सीपीआर दिला. सीपीआर हा हार्ट अटॅक आल्यानंतर दिला जाणारा तात्काळ असा उपचार आहे. हे वाचा - Maa Robot Video : बायको आजारी म्हणून दिव्यांग लेकीला दिली अशी आई; मजूर बाबाचा आविष्कार पाहून भलेभले थक्क व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती स्ट्रेचरवर आहे आणि एक जवान त्याच्या छातीवर हात ठेवून वेगाने दाब देतो आहे. यालाच सीपीआर असं म्हटलं जातं.
माहितीनुसार डॉक्टरांनी सांगितलं की या व्यक्तीला वेळेत सीपीआर दिल्याने त्याचा जीव वाचला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे. हे वाचा - 5 वर्षापूर्वी हरवलेली व्यक्तीच्या नाकातली रिंग; अखेर शरीराच्या अशा भागात सापडली की डॉक्टरही शॉक व्हिडीओ पाहिल्यानंतर जवानाचं सर्वांनी कौतुक केलं आहे. कुणी याला सुपरहिरो, तर कुणी सुपरमॅन म्हटलं आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.