दिल्ली, 28 फेब्रुवारी : आपला जीव धोक्यात घालून दुसऱ्यांचा जीव वाचवणाऱ्या सीआयएसएफ (CISF) जवानांचे काही व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एक लहान मुलगी 25 फूट उंचावर असलेल्या मेट्रो स्टेशनच्या ग्रिलवर अडकली. जिथं फक्त एक पाय राहिल इतकीच जागा होती. अशा ठिकाणाहून एका जवानाने या चिमुकलीचा जीव वाचवला आहे. दिल्लीतील मेट्रो स्टेशनवर 27 फेब्रुवारीला घडलेली ही घटना. निर्माण विहार मेट्रो स्टेशनवर एक 8 वर्षांची मुलगी खेळता खेळता 25 फूट उंच स्टेशनवर गेली. तिथं ती ग्रिलमध्ये अडकली. तिला तिथून बाहेर पडता येईना. आपण अडकलो हे तिला समजलं आणि ती घाबरली. त्यानंतर ती मोठमोठ्याने रडू लागली, मदतीसाठी आवाज देऊ लागली. तिचं रडणं ऐकून लोकांचं लक्ष तिच्याकडे गेलं त्यानंतर तिच्या वाचवण्यासाठी धडपड सुरू झाली. ही मुलगी याच मेट्रो स्टेशनच्या खाली राहते, अशी माहिती मिळाली आहे. हे वाचा - ओ तेरी! चक्क मोर - शेळी आपसात भिडले; कधीच पाहिला नसेल असा जबरदस्त FIGHTING VIDEO CISF च्या QRT ला या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर जवान तात्काळ तिथं दाखल झाले. एक जवान फक्त एक पाय राहिल अशा रेलिंगवरून कसाबसा या मुलीपर्यंत पोहोचला. तिथं ग्रिलमधून त्या मुलीला बाहेर काढलं, तिला आपल्या छातीला कवटाळून धरलं. एका हातात मुलगी आणि दुसऱ्या हाताने त्याने ग्रिलला धरलं होतं. त्यानंतर एकएक पाऊल टाकत तो पुढे सरकत होता.
व्हिडीओत पाहू शकता जवान कशा पद्धतीने रेलिंगवरून खाली उतरतो आहे. मुलीला एका हातात धरलं आणि दुसऱ्या हातात ग्रिलला धरून रेलिंगवरून तोल सावरत चालत आहे. त्याचा थोडा जरी पाय घसरला असता तर दोघांच्याही जीवाला धोका होता. हे वाचा - Russia Ukraine Warच्या पार्श्वभूमीवर आनंद महिद्रांनी शेअर केला हृदयस्पर्शी Video अशा पद्धतीने रेलिंगवर चालून या जवानाने मुलीला तिथून सुरक्षितरित्या बाहेर काढलं आणि तिच्या आईच्या स्वाधीन केलं.