मुंबई, 15 डिसेंबर : सध्या वर्षातला शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर सुरू आहे. ख्रिसमस अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. जगभरातला ख्रिश्चन समुदाय मोठ्या उत्साहाने या सणाची तयारी करण्यात व्यग्र आहे. ख्रिसमसच्या निमित्ताने अनेक वर्षांपासून लहान मुलं एका परंपरेचं पालन करतात. ख्रिसमसच्या आदल्या रात्री तुम्ही जे काही मागाल ते सकाळी उठल्यावर मिळेल, असं लहान मुलांना सांगितलेलं असतं. सांताक्लॉजकडे आपल्या आवडत्या गोष्टी मागण्यासाठी काही मुलं पत्रंही लिहितात. लहान मुलांना विश्वास असतो, की त्यांची पत्रं सांतापर्यंत पोहोचतील आणि त्यांची इच्छा पूर्ण होईल. सध्या सोशल मीडियावर आठ वर्षांच्या मुलीनं सांताक्लॉजला लिहिलेलं पत्र व्हायरल झालं आहे. ‘झी न्यूज’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ब्रिटनमधल्या निकोल कोनेल नावाच्या महिलेनं अलीकडेच तिच्या बहिणीच्या मुलीने ख्रिसमसच्या आधी सांताला लिहिलेल्या पत्राचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. तिने ट्विटच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, की ‘माझ्या बहिणीला तिच्या आठ वर्षांच्या मुलीने सांताला लिहिलेलं पत्र नुकतंच मिळालं आहे. एवढ्या लहान वयात कोणी असा विचार कसा करू शकतं, हा विचार करूनच मी खूप रडले.’ हेही वाचा : बाबाचं प्रेम! पावसापासून मुलाला असं वाचवलं, व्हायरल फोटो पाहून व्हाल भावुक साधारणपणे लहान मुलं सांताक्लॉजकडे खेळणी आणि खाऊची मागणी करतात; मात्र निकोलच्या बहिणीच्या मुलीनं स्वत:साठी भेटवस्तू मागण्याऐवजी सांताकडे आर्थिक मदत मागितली आहे. या मुलीने सांताला तिच्या आई आणि वडिलांना त्यांच्या आर्थिक स्थितीत मदत करण्यास सांगितलं आहे. कारण, ते बिलं आणि कर्जाच्या ओझ्याखाली वावरत आहेत.
एमी नावाच्या मुलीनं पत्रात लिहिलं आहे, की ‘सांता, मला ख्रिसमससाठी मम्मी आणि डॅडीसाठी काही पैसे हवे आहेत. बिलं आणि कर्जामुळे ते खूप अस्वस्थ आहेत. मलाही खूप वाईट वाटतं. कृपया, सांता तू हे काम करू शकतोस का? मला माहिती आहे, की मी खूप जास्त मागणी करत आहे. याचं मला वाईटही वाटत आहे. एमीकडून तुला खूप प्रेम.’ पत्राच्या शेवटी एमीनं ‘प्लीज’ म्हणून सांताला कळकळीची विनंती केली आहे. हेही वाचा : VIDEO - 20 रुपयांसाठी दिला लाखमोलाचा जीव; भरधाव ट्रेनसमोर तरुणाने आयुष्याचा केला The End एमीच्या या भावनिक पत्राने अनेकांना भावूक केलं आहे. अनेक जण या चिमुरडीच्या निरागसतेने खूप प्रभावित झाले आहेत. ट्विटवर एका युझरने कमेंट केली, की ‘हे वाचून माझ्या डोळ्यांत अश्रू आले.’ एका युझरने ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना या मुलीची अडचण सोडवण्याची विनंती केली आहे